आठवी ते बारावीची विद्यार्थी संख्या वाढली

सुमारे पंधरा टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती
आठवी ते बारावीची विद्यार्थी संख्या वाढली
File photo

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

करोनामुळे (Covid 19) राज्यातील शाळा बंद (State School Close) करण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने (Maharashtra Government) आठवी ते बारावीचे वर्ग (Class) सुरु करण्यास परवानगी (Permission) दिली होती. त्यातही विविध निकषांच्या अधीन राहून राज्यात (State) सुमारे 17 हजार 701 शाळा सुरू झाल्या आहेत. या उघडल्या गेलेल्या शाळांमध्ये पंधरा लाख 12 हजार 404 विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली आहे.

राज्य सरकारने (State Government) घालून दिलेल्या निकषाच्या अधीन राहून शहर व महानगरातील शाळा (Metropolitan schools) अद्याप सुरू होऊ शकलेल्या नाहीत, मात्र निकषात बसलेल्या शाळा (School) सुरू झाल्या असल्या तरी राज्यातील (Maharashtra State) एकूण 46 हजार 365 शाळांमध्ये एक कोटी तीन लाख सात हजार 457 विद्यार्थी शिक्षण (education) घेत आहेत. एकूण शाळांपैकी 17 हजार 701 शाळा (School) सुरू झाल्या आहे. या शाळांमध्ये पंधरा लाख 12 हजार 404 विद्यार्थी नियमितपणे उपस्थित राहत आहेत. राज्यात सुमारे 18 टक्के शाळा सुरू झाल्या असून उपस्थिती सरासरी 15 टक्क्यावरती आहे.

लातूर विभागात सर्वाधिक विद्यार्थी-

राज्यात अमरावती विभाग अंतर्गत 2282 शाळा सुरू झालेल्या असून हे प्रमाण 65 टक्के इतके आहे. 1 लाख 25 हजार 125 विद्यार्थी विद्यार्थी प्रत्यक्ष शिकत आहेत. औरंगाबाद विभागामध्ये 1 हजार 813 शाळा सुरू झालेल्या असून एक लाख 93 हजार 940 विद्यार्थी शिकत आहेत. हे प्रमाण सुमारे 25 टक्के इतके आहे. कोल्हापूर विभागात 652 शाळा सुरू झालेल्या असून 39 हजार 913 विद्यार्थी सध्या उपस्थित राहत आहेत. हे प्रमाण पाच टक्के इतके आहे. नागपूर विभागाअंतर्गत 1779 शाळा सुरू झाल्या असून एक लाख 53 हजार 320 विद्यार्थी उपस्थित असून हे प्रमाण शेकडा सव्वीस टक्के इतके आहे. नाशिक विभागा अंतर्गत 1 हजार 148 शाळा सुरू झालेल्या असून विद्यार्थ्यांची उपस्थिती एक लाख वीस हजार 451 इतकी आहे. हे प्रमाण सुमारे वीस टक्के आहे. पुणे विभागात 561 शाळा सुरू झालेल्या असून 39 हजार 322 विद्यार्थी शिकत आहेत. हे प्रमाण 5.37 इतके आहे. मुंबई विभागा अंतर्गत अवघ्या 226 शाळा सुरू झालेल्या असून वीस हजार 84 विद्यार्थी शिकत आहेत हे प्रमाण 2.1 टक्के इतके आहे. लातूर विभागांतर्गत 779 शाळा सुरू झालेल्या असून एक लाख 28 हजार 94 विद्यार्थी उपस्थित आहेत. हे शेकडा प्रमाण 56. 58 इतके आहे. दहावी राज्यातील काही जिल्ह्याची माहिती उपलब्ध होऊ शकली नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यात मुंबई, रायगड, मुंबई मनपा, लातूर, जिल्ह्यांची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

पुणे विभागात नगर आघाडीवर-

शैक्षणिकदृष्ट्या पुणे विभागात पुणे, नगर, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यातील 2 हजार 884 एकूण शाळा असून सात लाख बत्तीस हजार 776 विद्यार्थी प्रवेशित आहेत. विभागात 561 शाळा सुरू झालेल्या आहेत. त्यापैकी 39 हजार 322 विद्यार्थ्यी सध्या नियमित उपस्थित राहत आहेत. विभागातील शाळा सुरू होण्याचे प्रमाण सुमारे वीस टक्के असून उपस्थितीचे प्रमाण 5.37 इतके आहेत.नगर जिल्ह्यात 850 शाळा असून दोन लाख 40 हजार 440 विद्यार्थी प्रवेशित आहेत. त्यापैकी 187 शाळा सुरू झाल्या आहेत. 16 हजार 227 विद्यार्थी निमित्त उपस्थित राहत असून शेकडा 22 टक्के शाळांचे सुरू होण्याचे प्रमाण आहे.उपस्थितीचे प्रमाण शेकडा 6.75 इतके आहे. जिल्ह्यात 947 शाळा असून दोन लाख 40 हजार 394 विद्यार्थी प्रवेशित आहेत. त्यापैकी 127 शाळा सुरू झालेल्या असून 1 हजार 357 विद्यार्थी नियमित उपस्थित राहतात. शाळा सुरू होण्याचे प्रमाण 13.41 टक्के असून उपस्थिती प्रमाण अवघे 3.48 टक्के आहे.

नाशिक विभागात नंदुरबार आघाडीवर-

नाशिक विभागातील एकूण दोन हजार 431 शाळा असून पाच लाख आठ हजार 928 विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. या विभागात 1 हजार 148 शाळा सुरू झालेल्या आहेत. त्यात 1 लाख 20 हजार 451 विद्यार्थी उपस्थित राहत आहे. शाळा सुरू होण्याचे प्रमाण शेकडा 47.22 इतके आहे. सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती प्रमाण 20.1 टक्के आहे. या विभागांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील 390 पैकी 342 शाळा सुरू झालेल्या आहे. सव्वीस हजार 226 विद्यार्थी उपस्थित राहत असून हे प्रमाण शेकडा 55 टक्के इतके आहे. तर शाळा सुरू होण्याचे प्रमाण 88 इतके आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com