विद्यार्थिनीने गळफास घेऊन केली आत्महत्या

विद्यार्थिनीने गळफास घेऊन केली आत्महत्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रीती मिलिंद इंगळे (वय 20 रा. मुंबई) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. नगर शहरातील नागापूर उपनगरात काकासाहेब म्हस्के वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात बुधवारी ही घटना उघडकीस आली.

प्रीती इंगळे ही दोन वर्षांपासून काकासाहेब म्हस्के वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिने मंगळवारी रात्री वसतिगृहामधील तिच्या खोलीमध्ये गळफास घेतला. बुधवारी सकाळी नऊ वाजता तिच्या शेजारी राहणार्‍या विद्यार्थिनींच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी वसतिगृहाचे पर्यवेक्षक निलेश रामा केदारे यांना ही माहिती दिली.

त्यांनी तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. खटके यांनी तपासणी करून उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com