महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग अल्पवयीन मुलाविरूद्ध गुन्हा दाखल
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहरातील बोरावके महाविद्यालयाच्या गेटसमोर सोमवारी (दि.9) विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात सुभेदारवस्ती भागातील अल्पवयीन मुलाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोरावके महाविद्यालयाच्या गेटसमोर सोमवारी (दि.9) सकाळी 11.15 वा. 16 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला तू मला फार आवडेस असे म्हणून या मुलाने शरीराला स्पर्श करून विनयभंग केला. विद्यार्थिनीने तिच्या बहिणीला सांगितले असता अल्पवयीन पीडित विद्यार्थिनीच्या बहिणीच्या तोंडात चापट मारून शिवीगाळ केली. दरम्यान, विद्यार्थिनीने स्वत: श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येेथे जाऊन फिर्याद दिली. त्यावरून वॉर्ड नं. 2 मधील सुभेदारवस्ती भागातील अल्पवयीन मुलाविरूद्ध शहर पोलिसांत भादंवि कलम 354, 354 (ड) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण सन 2012, पोक्सो कायदा कलम 12 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस उप अधीक्षक़ संदीप मिटके, पोलीस निरीक्षक़ संजय सानप यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उप निरीक्षक समाधान सुरवाडे पुढील तपास करीत आहेत.