सरावाच्या खंडानंतर होणार्‍या ‘शिष्यवृत्ती’साठी विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’

8 ऑगस्टला परीक्षा : विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा जीव टांगणीला
सरावाच्या खंडानंतर होणार्‍या ‘शिष्यवृत्ती’साठी विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे (Covid 19 second wave) ऐनवेळी दोनदा लांबलेल्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेची तारखी (Scholarship Exam Dates) शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) जाहीर केली आहे. मात्र, करोनाच्या दुसर्‍या लाटेत चार ते पाच महिने ऑनलाईन सरावात खंड (Online practice volume) पडल्याने विद्यार्थी ही परीक्षा कशी देणार, परीक्षेचा निकाल किती घसरणार यामुळे विद्यार्थ्यांसह, शिक्षक आणि पालकांचा जीव टांगणला लागला आहे.

पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्तीसाठी जिल्ह्यातून (Ahmednagar District) 47 हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. मात्र, करोना प्रार्दुभावामुळे मागील वर्षी अपवाद वगळता शिष्यवृत्तीच्या परीक्षेची तयारी शिक्षण विभागाला ऑफलाईन पध्दतीने करून घेता आली. करोनापूर्वी या परीक्षेची जोरदार तयार शिक्षण विभाग करून घेत असत. मात्र, करोनाच्या पहिल्या लाटनंतर शाळा सुरू होवू न शकल्याने या परीक्षेसाठी (Exam) ऑनलाईन पाठ घेण्यात आले. तर दुसरीकडे अनेक वेळा तयारी करून ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ शालेय शिक्षण विभागावर आली. आता करोनाचा संसर्ग कमी झाला असून शिक्षण विभागाने शिष्यवृत्तीच्या परीक्षेची तारीख जाहीर केली असून येत्या 8 ऑग्रस्टला ही परीक्षा होणार आहे.

दरम्यान नगर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने (Nagar Zilla Parishad Primary Education Department) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एप्रिल महिन्यांत तयार करून ठेवली होती. या परीक्षेसाठी पाचवीचे 225 तर आठवीचे 143 केंद्र निश्‍चित करण्यात आले आहेत. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून 2 हजार 19 शाळांच्या 47 हजार 76 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. यात 30 हजार 115 पाचवीचे विद्यार्थी, तर 16 हजार 961 आठवीचे विद्यार्थी आहेत. करोना संसर्गामुळे यंदा शिष्यवृृत्तीचे परीक्षेसाठी जिल्हा पातळीवरून एकही ऑफलाईन सराव परीक्षा घेता आली नाही. मात्र, राहाता आणि कोपरगाव तालुक्यांसह अन्य तालुक्यात ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने सराव परीक्षा झालेल्या आहेत.

दरम्यान, मार्चपासून करोनाची दुसरी लाट जोरात असल्याने शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सुरू असलेले ऑनलाईन वर्गही बंद पडलेले असून दरम्यानच्या काळात चार महिन्यांहून अधिक कालावधी गेला असून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या अभ्यासक्रमाचा विसरी पडल्याची शक्यता असून याचा परिणाम परीक्षेच्या निकालावर होण्याची शक्यता आहे.

300 गुणांची परीक्षा

शिष्यवृत्तीची परीक्षा ही 300 गुणांची असून यात 150 गुणात मराठी आणि गणित विषयांचे प्रश्‍न राहणार असून दुसर्‍या 150 गुणाच्या पेपरमध्ये इंग्रजी आणि बुध्दीमत्तेसाठी प्रश्‍न राहणार आहेत. गेली दोन वर्षे शिक्षणाचा खेळखंडोबा झालेला असल्याने आता शिष्यवृत्तीच्या परीक्षेनंतर काय निकाल लागणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com