विद्यार्थ्यांना महाविद्यालयात मिळणार लस

15 ते 18 वयोगटासाठी महापालिकेकडून नियोजन
विद्यार्थ्यांना महाविद्यालयात मिळणार लस

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका व ओमिक्रॉनची वाढती रूग्णसंख्येमुळे 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अहमदनगर शहरातील लसीकरण केंद्रावरील गर्दीत वाढ झाली आहे. गर्दीतून संसर्ग होवू नये, सर्वांचे लसीकरण वेळेत व्हावे यासाठी महापालिकेने शाळा-महाविद्यालयनिहाय जाऊन डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने तसे नियोजन केले असून, आरोग्य केंद्रनिहाय शाळा-महाविद्यालयात हे लसीकरण होणार आहे.

15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी सोमवारपासून लसीकरण सुरू झाले. या मुलांना फक्त कोव्हॅक्सिनचा डोस देण्यात येणार आहे. मात्र आरोग्य केंद्रावर सर्वच नागरिकांना लसीकरण देण्यात येत असल्याने तेथे गर्दी वाढत आहे. तसेच तेथे येणार्‍यांना कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड असे दोन्ही डोस देण्यात येत आहेत. गर्दी वाढल्यावर गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने 15 वर्षांपुढील मुलांसाठी वेगळे नियोजन करण्याचा निर्णय घेतला. जवळपास 19 हजार मुलांना लस द्यावयाची आहे. त्यामुळे त्यांना आरोग्य केंद्रावर रांग लावायला लावण्याऐवजी शाळा-महाविद्यालयात जाऊनच लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेचे सध्या शहरात सात आरोग्य केंद्र आहे. या सर्व आरोग्य केंद्रांतर्गत 50 शाळा आणि आठ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. एका दिवशी चारशे डोस देण्याचे नियोजन आहे.

Related Stories

No stories found.