प्रदीर्घ खंडानंतर नगरमध्ये जोरदार पाऊस

उकाड्याने हैराण नगरकरांना दिलासा
प्रदीर्घ खंडानंतर नगरमध्ये जोरदार पाऊस

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या तीन आठवडे ते पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर नगर शहरात (Nagar City) गुरूवारी पावसाचे जोरदार आगमन (Strong arrival of rain) झाले. अर्धा ते पाऊण तास झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. दरम्यान, उकाड्याने हैराण झालेल्या नगरकरांना या पावसामुळे मोठा दिलासा (Great relief from the rain) मिळाला असून वातावरणात (atmosphere) गारवा निर्माण झाला आहे. तसेच मोठ्या खंडानंतर पाऊस पडण्यास सुरूवात झाल्याने शेतकर्‍यांसह (Farmers) व्यापारी यांचे टेन्शन काही प्रमाणात कमी झाले आहे.

जिल्ह्यात गेल्या तीन आठवडे ते पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. या काळात दिवसभर कडक ऊन व प्रचंड उकाडा जाणवत होता. पाऊस गायब झाल्याने शेतकर्‍यांसह व्यापारी चिंतेत होते. जिल्ह्यात (Ahmednagar District) अनेक भागात पावसाअभावी पिके करपण्यास सुरूवात झाली होती. दरम्यान, हवामान खात्याने पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला होता, त्यानूसार जिल्ह्यात खंडीत प्रमाणात पाऊस पडण्यास सुरूवात झाली आहे.

गुरूवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. हवामान खात्याने गुरूवारी पावसाचा अंदाज वर्तविला होता. दुपारी चार वाजता नगर शहरासह (Nagar City) उपनगरात व नगर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे नगर तालुक्यातील शेती पिकांना जीवदान (Life saving to agricultural crops) मिळाले आहे. सुमारे अर्धा तास वार्‍यासह कोसळलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com