नगरमधील 20 संपकर्‍यांचं निलंबन

आतापर्यंत 2053 संपकर्‍यांचं निलंबन, पुण्यातील आकडा सर्वाधिक
नगरमधील 20 संपकर्‍यांचं निलंबन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाहीये. एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून संप मागे घेण्याच्या तयारीत नाहीयेत. राज्य सरकारकडून एसटी कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात येत असतानाही संप सुरूच आहे.

राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावं यासाठी एसटी कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. मात्र कायद्याने हे शक्य नसल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे. यासाठी त्यांनी कर्मचार्‍यांकडे काही अवधीही मागितला आहे. मात्र एसटी कर्मचारी मागे हटायला तयार नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे राज्य सरकारने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

त्यातही संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांवर कडक कारवाईची एसटी महामंडळाची तयारी सुरू आहे. निलंबनानंतर आता कायमस्वरूपी कामावरून काढून टाकण्याची कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यातून 138 कर्मचार्‍यांचा निलंबन करण्यात आलं असून त्यानंतर ठाण्यातून 73, नाशिकमधून 54 कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आलं आहे. नगर जिल्ह्यातील 20 कर्मचार्‍यांनाही निलंबित करण्यात आले आहे.दरम्यान, काल चौथ्या दिवशीही संप सुरू होता. पुन्हा झालेल्या बैठकीतही तोडगा निघाला नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com