नगर जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध

नव्याने ७३ बाधित वाढले
नगर जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध

अहमदनगर (प्रतिनिधी)

करोनाचा वाढता संसर्ग आणि ओमिक्रॉनचा धोका टाळण्यासाठी जिल्ह्यात विवाह समारंभ, मेळावे, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अथवा धार्मिक कार्यक्रमातील उपस्थिती ५० पर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. तसेच अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० व्यक्तीपर्यंत मर्यादित ठेवण्याचे आदेश राज्य सरकार पाठोपाठ जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी काढले आहेत.

नगर जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध
नव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या...

दरम्यान, जिल्ह्यात नववर्षाचे स्वागत करताना धार्मिक स्थळं, पर्यटन स्थळं तसेच कोणत्याही कार्यक्रमात, नागरिकांची जास्त गर्दी होणार नाही तसेच, सामाजिक अंतर पाळले जाईल व कोविडच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याबाबत स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक असल्याच्या सूचना डॉ. भोसले यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविडचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी, प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत डॉ. भोसले बोलत होते.

नगर जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध
भाग्यश्रीच्या मनमोहक अदांची चाहत्यांना पडली भुरळ, पाहा फोटो

बैठकीला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. भारतकुमार रामटेके, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांच्यासह आरोग विभाग आणि पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. भोसले म्हणाले, जिल्ह्यामधील, धार्मिक स्थळे व पर्यटन स्थळे येथे नागरिकांची जास्त गर्दी होणार नाही, त्यासाठी संबंधित प्रांताधिकारी तहसीलदार आणि गट विकास अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी, नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पथकाची नेमणूक करावी. जिल्ह्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आणि प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे काटेकोरपणे पालन होत आहे किंवा नाही, याबाबत पाहणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी. तसेच लसीकरणाचे प्रमाण वाढले पाहिजे यासाठी नियोजन करावे, गावात व तालुक्यात १०० टक्के लसीकरण लवकर कसे पूर्ण होईल, याबाबत नियोजन करावे. संभाव्य तिसरा लाटेचा धोका लक्षात घेता आणि जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या या दृष्टीने आरोग्य विभागाने रुग्णालयातील बेडची संख्या, ऑक्सिजन व्यवस्था, अतिदक्षता विभागातील सेवा सुविधा, औषधसाठा याबाबत सुद्धा नियोजन करणे आवश्यक आहे. प्रशासन व आरोग्य यंत्रणा यांनी सतर्क रहावे, आरोग्य विभागाने रुग्णालयातील फायर ऑडिट, सेफ्टी ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट बाबत दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या.Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' का म्हणतात?

नगर जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध
Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' का म्हणतात?

दुसरीकडे जिल्हयात ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेपासून प्रतिबंधात्मक निर्बंध आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार विवाह समारंभ, बंद किंवा मोकळया जागेत आयोजित करताना उपस्थितांची संख्या जास्तीत जास्त ५० पर्यंत मर्यादित ठेवण्याचे आदेशित केले आहे. तसेच, कोणत्याही मेळावे, कार्यक्रमाच्या बाबतीत मग ते सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अथवा धार्मिक कार्यक्रम बंद जागेत अथवा मोकळ्या जागेत आयोजित करताना उपस्थितांची संख्या जास्तीत जास्त ५० पर्यंत मर्यादित ठेवण्याचे आणि अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० व्यक्तीपर्यंत मर्यादित ठेवण्याचे आदेशित केले आहे.

नगर जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

नव्याने ७३ बाधित वाढले

जिल्ह्यात शुक्रवारी ६४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनावर मात केलेल्यांची संख्या ३ लाख ५१ हजार ४७२ इतकी झाली आहे. दरम्यान, काल जिल्ह्याच्या रूग्ण संख्येत ७३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३६९ इतकी झाली आहे. यात जिल्हा रुग्णालयाच्या टेस्ट लॅबमध्ये ३७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २७ आणि अँटीजेन चाचणीत ९ रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून रुग्णांमध्ये मनपा ९, अकोले १, नगर ग्रामीण २, नेवासा १, पारनेर ३, पाथर्डी ४, राहाता १, संगमनेर ४, श्रीगोंदा ११ आणि श्रीरामपूर १ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४, अकाले १, जामखेड १, नगर ग्रामीण १, पारनेर १, राहाता ३, राहुरी १, संगमनेर २, शेवगाव १, श्रीगोंदा ६, श्रीरामपूर ४, इतर जिल्हा १ आणि इतर राज्यन १ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत ९ जण बाधित आढळून आले. यात पाथर्डी २, संगमनेर ४, श्रीरामपूर २ आणि इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

नगर जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध
सोशल मीडियावर सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com