नगर शहरात आज मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन

काय सुरू, काय बंद?
नगर शहरात आज मध्यरात्रीपासून कडक  लॉकडाऊन

अहमदनगर|Ahmedagar

शहरात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने सात दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहिर केला. याची अंमलबजावणी आज मध्यरात्रीपासून सुरू होणार आहे. 10 मेच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. याबाबत आयुक्त शंकर गोरे यांनी आदेश जारी केला आहे.

‘हे’ असणार सुरू

- वैद्यकीय सेवा, औषध दुकाने

- अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोलपंप नियमित वेळेनुसार

- घरपोहच गॅस वितरण

- सर्व बँका

- दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री सकाळी 7 ते 11

- पशुखाद्य विक्री सकाळी 7 ते 11

‘हे’ असणार बंद

- किराणा दुकाने व त्या संबंधित मालाची खरेदी- विक्री

- भाजीपाला व फळे बाजार मालाची खरेदी- विक्री

- सर्व खाजगी आस्थापना

- अंडी, मटन, चिकण व मत्स्य विक्री

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com