
तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe
संगमनेर (Sangamner) तालुक्यातील तळेगाव दिघे (Talegav Dighe) परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास वादळी (Stormy) वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान काकडवाडी (Kakadwadi) येथे वादळी पावसात वीज अंगावर पडल्याने (Lightning Struck) दोन संकरित गायी जागीच ठार (Cow Death) झाल्या. सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
काकडवाडी येथे शेतकरी राजाराम शिवनाथ मुळे यांच्या मालकीच्या दोन संकरित गायींवर (Cow) वादळी पावसात (Stormy Rain) वीज कोसळली. त्यामुळे दोन गायी जागीच ठार झाल्या. नजीकच अन्य काही गायी (Cow) व जनावरें बांधलेली होती. मात्र सुदैवान्रे ती बचावली. संगमनेर (Sangamner) तालुका पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पानसरे यांनी मृत गायींचा पंचनामा केला. यावेळी डॉ. सुनील भागवत यांनी त्यांना सहाय्य केले.
वीज अंगावर पडून दोन गायी ठार (Cow Death) झाल्याने अंदाजे एक लाख ७० हजार रुपयांचे सदर शेतकऱ्याची आर्थिक हानी झाली. वादळी पावसात वीज पडल्याने दोन गायी जागीच ठार झाल्याने शेतकरी राजाराम मुळे यांच्यावर मोठे संकट कोसळले. सदर शेतकऱ्यास शासनाने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काकडवाडी (Kakadwadi) येथील शेतकऱ्यांनी केली आहे.