वादळी पावसाने एकरूखे परिसरात मोठे नुकसान

वादळी पावसाने एकरूखे परिसरात मोठे नुकसान

एकरुखे |वार्ताहर| Ekrukhe

राहता तालुक्यातील एकरुखे येथे शनिवारी रात्री झालेल्या वादळी पावसाने मोठे नुकसान केले. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर एकाची घराची भिंत पडली तर एकाच्या घरचे पत्रे उडाले.तर शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन, मका, ऊस पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

शनिवारी झालेल्या वादळी पावसाने शेतकर्‍यांचे फळ बागा, ऊस, सोयाबीन, मका याची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली असून रामदास झुरळे यांच्या राहत्या घराची भिंत पडली. कैलास निर्मळ यांचे घरचे पत्रे उडाले. म्हंसोबा देवस्थानचे शेड उडून गेले. बबनराव आग्रे यांचे 3 एकर ऊस, रांजणगाव खु. येथील प्रशांत गाढवे यांचा 15 एकर ऊस जमिनीवर लोळत आहे.

तर फळ बाग नुकसानी मध्ये पोपट आग्रे,अशोक गाढवे, प्रताप आग्रे, ज्ञानेशवर आग्रे यांच्या काढणीला आलेल्या बागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून काही झाडे उन्मळून पडले. बाळासाहेब आग्रे व किरण आग्रे यांचे मकाचे पीक जमीनीवर टेकले. दत्तात्रय आग्रे यांचा 7 एकर पेरू बागेची झाडे पडून नुकसान झाले. वृक्ष पडल्याने वीज वितरण कंपनीचे वादळी वार्‍यने पोल व वीज तारा बर्‍याच ठिकाणी तुटलेल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com