करोनाच्या तिसर्‍या लाटेला रोखण्यासाठी श्रीरामपुरात आढावा बैठक

आ. लहू कानडे यांनी ग्रामीण रुग्णालयाची केली पाहणी
करोनाच्या तिसर्‍या लाटेला रोखण्यासाठी श्रीरामपुरात आढावा बैठक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

करोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आ. लहू कानडे (MLA Lahu Kanade) यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट (Visit to Rural Hospital) देऊन तिसर्‍या लाटेला रोखण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या कामांची पाहणी केली. तसेच महसूल (Revenue), नगरपालिका (Municipality), आरोग्य विभाग (Health Department), आणि पोलीस खात्यातील अधिकारी यांची आढावा बैठक (Review meeting) घेतली.

ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन प्लांट (Oxygen plant) उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच नवीन 75 ऑक्सिजन बेड (Oxygen bed) वाढविण्यासाठी बांधण्यात येणार्‍या इमारतीचे कामही जवळजवळ पूर्ण झाले आहे. जवळपास तीन कोटी रुपयाचा निधी खर्च करून श्रीरामपूर उपजिल्हा रुग्णालयात (Shrirampur Sub-District Hospital) किमान 125 ऑक्सीजन बेडची सुविधा निर्माण केली जात आहे. आज आमदार लहू कानडे यांनी या दोन्ही कामांना भेटी देऊन त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच ग्रामीण रुग्णालयात अधिकार्‍यांची बैठक घेऊन 15 ऑगस्ट पूर्वी सदरचे रुग्णालय ऑक्सिजनच्या पुरवठासह सुरू करण्यासाठी करावयाच्या कामाबाबतही सूचना दिल्या.

शासनाने करोनाची तिसरी लाट (third wave of corona) रोखण्यासाठी ग्रामीण रुग्णालय येथे नवीन 50 ऑक्सिजन बेड आणि 128 बेडसना पुरवठा करू शकणार्‍या ऑक्सीजन प्लांट ची उभारणी हाती घेतली आहे. या कामासाठी कमी पडणारा आवश्यक तेवढा निधी आमदार निधीमधून उपलब्ध करून दिला आहे. यामधून ऑक्सीजन प्लांटसाठी 200 केव्ही क्षमतेचा जनरेटर बॅकअप आणि नवीन इमारतीसाठी स्वतंत्र टॉयलेट ब्लॉक आणि स्टाफसाठी (Staff) अधिक सुविधा मिळावी म्हणून व इमारत दीर्घकाळ उपयोगात यावी यासाठी पत्र्याऐवजी भिंतीचे मजबूत बांधकाम अशा बदलासह रुग्णालय इमारत बांधण्यात येत आहे. इमारत पूर्ण होऊन तेथे सर्व साधन सामग्री ऑक्सीजन लाईनसह 10 ऑगस्ट पूर्वी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. 25 खाटांचा स्वतंत्र बालकांसाठीचा कक्षही उभारण्यात येत आहे.

आ. कानडे (MLA Lahu Kanade) यांनी अहमदनगर जिल्ह्यातील करोना च्या वाढत्या रुग्णसंख्या विषयी काळजी व्यक्त करून श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात काळजी करण्याच्या दृष्टीने उपायोजना करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या. तसेच लसीकरणाचा वेग (Vaccination) वाढून सर्व ठिकाणी समप्रमाणात गाव खेड्यापर्यंत लसीकरण पोहोचेल व तक्रारी येणार नाहीत याची खबरदारी घेण्याचेही सूचना दिल्या. गर्दी (Crowd) टाळण्यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी तथापि जनतेला त्रास होणार नाही याची खबरदारी ही घ्यावी आणि सर्वांनी समन्वय ठेवून काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक संजय सानप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश बंड, उपनगराध्यक्ष करण दादा ससाणे, ज्येष्ठ नेते इंद्रभान पाटील थोरात, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, विष्णुपंत खंडागळे, सतीश बोर्डे, आबा पवार आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com