किसान पार्सलला नगरच्या रेल्वेस्थानकात थांबा
सार्वमत

किसान पार्सलला नगरच्या रेल्वेस्थानकात थांबा

दर गुरूवारी धावणार गाडी

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

शेतमालाची वाहतूक करणारी किसान पार्सल रेल्वेला नगर रेल्वे स्टेशनवर थांबा मिळाला आहे. प्रत्येक गुरूवारी ही गाडी नगरच्या रेल्वे स्थानकावर थांबेल अशी माहिती नगरचे प्रबंधक नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली.

केंद्र सरकारने 2020 च्या अर्थसंकल्पात ‘किसान रेल्वे’ सुरु करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने ही ‘किसान रेल्वे’ सुरु करून वचनपूर्ती केली आहे. शेतकर्‍यांचे उत्पादन खराब न होता इतर राज्यात तत्परतेने जाण्यासाठी ही विशेष रेल्वे सुरु करण्यात आली आहे.  किसान स्पेशल पार्सल ट्रेन नाशिकमधील देवळाली येथून निघणार असून बिहारमधील धानापूर येथे 32 तासात पोहोचणार आहे. ही किसान स्पेशल पार्सल ट्रेन आठवडयातून एकदाच धावणार आहे. नगर रेल्वे स्थाकावर दर गुरुवारी येणार्‍या या रेल्वेगाडीला थांबा देण्यात आला आहे, अशी माहिती नगरचे रेल्वे स्टेशन प्रबंधक नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली.

या गाडीबाबत मातिही देताना मुख्य वाणिज्य निरिक्षक रामेश्वर मीना म्हणाले, अहमदनगर मधील शेतकर्‍यांचे उत्पादन फळे, भाज्या, दूध हे इतर राज्यात या पार्सल गाडीच्या मध्यातून वेगाने पोचणार आहे. यासाठी डीप फ्रीजची व्यवस्था असलेल डबे या पार्सल ट्रेनला जोडण्यात आले आहेत. अहमदनगर रेल्वे स्थानकावरून वरुन ही गाडी सर्वमाल घेऊन मनमाडमार्गे जाणार आहे. शेतकर्‍यांना आपला माल इतर राज्यात विकून व्यवसाय वाढवता यावा यासाठी शेतकर्‍यांच्या फायद्याच्या या ट्रेनला अहमदनगर स्टेशनवर थांबा असल्याने शेतकर्‍यांनी आपला फायदा करुन घ्यावा. अधिक माहितीसाठी (0214) 2471381 या फोन नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com