‘रेमडेसिवीर’ चा काळाबाजार थांबवा

संभाजी ब्रिगेडचे राज्यमंत्री तनपुरे यांना निवेदन
‘रेमडेसिवीर’ चा काळाबाजार थांबवा
रेमडेसिवीर

अहमदनगर (प्रतिनिधी) - रेमडेसिवीर औषधांचा काळाबाजार थांबून पुरेसा साठा उपलब्ध करावा, सर्वसामान्य नागरिकांना प्रशासनाकडून बेड, ऑक्सिजन वेळेवर उपलब्ध करून देण्यात यावे,

तसेच जिल्ह्यात पुढील आठ दिवस पूर्णता संचारबंदी करण्यात यावी या मागणीचे निवेदन राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांना स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष आकाश वायकर यांनी दिले आहे. यावेळी शहरअध्यक्ष अमोल खरात, योगेश आजबे, अक्षय लाळगे, आशिष तापकीरे, मनीष चव्हाण उपस्थित होते. याप्रसंगी मंत्री तनपुरे म्हणाले, याबाबत मी जिल्हाधिकारी यांचाशी चर्चा केली आहे. तसेच जिल्हारुग्णालय येथे पाहणी करून आदेश देण्यात येणार आहे.

जिल्ह्यामध्ये रेमडेसिवीर औषधांची कमतरता भासत असून सदर औषधांचा काळाबाजार होत आहे. सर्वसामान्य नागरिकांना बेड, ऑक्सिजन व व्हेंटीलेटर वेळेवर उपलब्ध होत नाहीत त्यामुळे सर्वसामान्य नागरिक धास्तावले आहेत. प्रशासनाने ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर बेड उपलब्ध करण्याबाबत युद्ध पातळीवर ठोस उपाययोजना कराव्यात म्हणजे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल आणि भरमसाठ बिल भरण्याचा आर्थिक भुर्दंड पडणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com