अज्ञातांकडून एसटी बसवर दगडफेक

अज्ञातांकडून एसटी बसवर दगडफेक

नेवासा l तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील सौंदाळा परिसरातील हॉटेल जयराजश्री जवळ आज (दि.27 नोव्हेंबर) सकाळी ९:३० सुमारास मोटारसायकल वरून आलेल्या अज्ञातांकडून एसटी बसवर दगडफेक करण्यात आली.

शेवगाव डेपोची बस क्रमांक एम एच ४० एन ८८९५ या बसवर दगडफेक करण्यात आली. यात बस चालकाच्या बाजूची पुढची एक काच फुटली आहे. ही बस शेवगाव कडून नेवासाकडे जात असताना ही घटना घडली. दगडफेक करणारे मात्र पसार झाले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com