दगडफेक प्रकरणी आणखी एक अटकेत

एलसीबी व तोफखाना पोलिसांची कारवाई
दगडफेक प्रकरणी आणखी एक अटकेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मकरसंक्रातीच्या दिवशी सायंकाळी मंगलगेट परिसरात झालेल्या दगडफेकीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. अनवर रमजान पठाण (वय 34 रा. कोठला) असे त्याचे नाव आहे.

दगडफेक प्रकरणी जखमी सुमित कैलास सुरसे (वय 25 रा. जे.जे.गल्ली, मंगलगेट) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 18 ते 20 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहेबाज बॉक्सर, तौसिफ ऊर्फ ताऊ शेख, अदनान शेख, बब्बु खान, शाकिर अजिज शेख, सलमान मेहबूब खान, मोसिम सादिक शेख व इतर 10 ते 12 अनोळखी विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सुरूवातीला सलमान खान व मोसिम शेख यांना अटक केली होती, ते पोलीस कोठडीत आहे. दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे. मंगळवारी सकाळी अनवर पठाण याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याला दाखल गुन्ह्यात अटक केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com