
संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
गौण खनिज कायद्याचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे गौण खनिजाचे उत्खनन करणार्या तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील 57 स्टोन क्रेशर व खाणपट्टाधारकांना तहसीलदार अमोल निकम यांनी तब्बल 765 कोटी 24 लाख 10 हजार 795 रुपयांचा दंड ठोठावला आहे. याबाबतच्या नोटीसाही स्टोन क्रेशरधारकांना पाठविण्यात आल्या आहेत. महिनाभरामध्ये दंड न भरल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यामुळे तालुक्यातील क्रेशर मालक व खाणपट्टाधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
संगमनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर गौण खनिजाचे उत्खनन केले जाते. अनेक स्टोन क्रेशर मालक बेकायदेशीरपणे दगड, मुरूम उचलतात. शासनाची रॉयल्टी न भरता अनेक गावांतील स्टोन क्रेशर सुरू आहेत. याबाबत महसूल अधिकार्यांकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या. महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नियमबाह्य स्टोन क्रेशर चालकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशामुळे जिल्हाधिकार्यांनी या प्रश्नात लक्ष घातले. जिल्हाधिकार्यांनी शिर्डी व श्रीरामपूर येथील प्रांत अधिकार्यांना आदेश दिल्यानंतर या अधिकार्यांनी तालुक्यातील स्टोन क्रेशरची पाहणी केली. उत्खनन होणार्या गौण खनिजाचे त्यांनी मोजमाप केले. यात अनेकजण दोषी आढळले.
संगमनेर तालुक्यातील विविध गावांतील 57 स्टोन क्रेशर चालक व खाणपट्टा धारक दोषी आढळल्याने त्यांना दंडाची नोटीस बजावण्यात आलेली आहे. दंडाची रक्कम भरण्यासाठी त्यांना महिनाभराची मुदत देण्यात आलेली आहे. महिन्याभरात रक्कम न भरल्यास पुढील कारवाई करण्यात येणार आहे. संबंधित स्टोन क्रेशर मालकांच्या जमिनीवर बोजा चढवला जाणार आहे.
उपोषणाचा इशारा देणार्यांना तहसीलदारांची तंबी
संगमनेर तालुक्यातील स्टोन क्रेशर चालकांना मोठ्या दंडाची नोटीस बजावण्यात आल्याने स्टोन क्रेशर चालक संतप्त झाले आहेत. दंडाची नोटीस ही अन्यायकारक असल्याने ती मागे घ्यावी या मागणीसाठी सोमनाथ गोडसे व इतर 36 जणांनी उपोषणाचा इशारा दिला होता. महसूल अधिकार्यांनी नियमानुसार कार्यवाही केली असल्याने संबंधितांनी उपोषण करू नये यातून कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित राहील अशी तंबी तहसीलदार अमोल निकम यांनी उपोषणकर्त्यांना दिली आहे. याबाबत उपोषणकर्त्यांना दिलेल्या पत्र त्यांनी म्हटले आहे की, जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार श्रीरामपूर व शिर्डी येथील प्रांतधिकार्यांनी दिनांक 20 ऑक्टोबर रोजी ए.ई.टी.एस मोजणी केली. त्यावेळी आपणास वारंवार संधी देण्यात आली होती. त्यानुसार शिर्डी, श्रीरामपूर येथील प्रांताधिकार्यांनी दि.11 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकार्यांना चौकशी अहवाल, सादर केलेला आहे. त्यानुसार जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशान्वये कार्यवाही करण्यात आली आहे. सदर प्रकरणात कायदेशिर पुर्तता करुनच या कार्यालयाकडून कार्यवाही करण्यात आलेली आहे. स्टोन क्रेशर चालकांना सदरचा आदेश मान्य नसल्यास ते प्रांताधिकार्यांकडे अपील दाखल करू शकतात.
दंडाची नोटीस बजावण्यात आलेले स्टोन क्रेशर, खाणपट्टा धारक व त्यांना ठोठावण्यात आलेल्या दंडाची रक्कम पुढीलप्रमाणे -
ज्ञानेश्वर कान्हू कुर्हाडे (येलखेपवाडी, 2 कोटी 33 लाख 10 हजार 20), अभिजित रावसाहेब येवले (कौठे कमळेश्वर, 2 कोटी 45 लाख 82 हजार 500), शिवाजी कारभारी येवले (मेंढवण, 2 कोटी 85 लाख 62 हडार 224), शिवाजी रावसाहेब कानवडे (मेंगाळवाडी, 49 लाख 45 हजार 820), लक्ष्मण तात्याबा कवडे (नांदुरीदुमाला, 18 लाख 94 हजार 760), मनोज दिलीप पुंड (मेंढवण, 1 कोटी 81 लाख 91 हजार 180), मनोज दिलीप पुंड (मेंढवण, 34 कोटी 16 लाख 3540), राजेंद्र हरिभाऊ कानकाटे (करुले, 3 कोटी 87 लाक 96 हजार 680), नवनाथ साहेबराव काळे (मेंढवण, 8 कोटी, 82 लाख 49 हजार 880), संपत कारभारी काळे (मेंढवण, 13 कोटी 42 लाख 18 हजार 220), सचिन भानुदास वाकचौरे (कौठे कमळेश्वर, 13 कोटी 37 लाख 69 हजार 960 रुपये), मिना बाळासाहेब चौधरी (कोकणगाव, 2 कोटी 13 हजार 140), अभिजित नानासाहेब चौधरी (कोकणगाव, 6 लाख 74 हजार 731), प्रवरा कन्स्ट्रक्शन कंपनी द्वारा विक्रम नवले (कर्जुलेपठार, 3 कोटी 13 लाख 20 हजार 860), मंगेश प्रकाश वाळुंज (खंदरमाळवाडी, 15 कोटी 90 लाख 60 हजार 500), राजेंद्र मधुकर गाडे (डोळासणे, 8 कोटी 91 लाख 3 हजार 20), राकेश चंद्रभान नवले (कौठे कमळेश्वर (1 कोटी 89 लाख 17 हजार 720), ज्ञानदेव यशवंत पालवे (कौठे कमळेश्वर, 3 कोटी 69 लाख 89 हजार 180), भाऊसाहेब नामदेव खेमनर (साकुर, 66 लाख 3 हजार 807), नानासाहेब दत्तात्रय बावके (मांची, 25 कोटी 65 लाख 93 हजार 200), मच्छिंद्र तुकाराम जोंधळे (कौठे कमळेश्वर, 41 लाख 21 हजार 600), विलास सुखदेव गायकवाड (कौठे कमळेश्वर, 23 कोटी 83 लाख 1 हजार 300), विशाल भिकाजी भुसाळ (पिंपळे, 17 कोटी 56 लाख 17 हजार 200), कासम दादामियाँ मुजावर (पिंपळे, 143 कोटी 12 लाख 51 हजार 300), शब्बीर पठाण (भारत रामचंद्र रणमाळे) (कासारे, 6 कोटी 84 लाख 25 हजार 220), अभयसिंग सुरेश जोंधळे (बाळापूर, 23 कोटी 68 लाख 55 हजार 300), बाबजी नामदेव गडाख (पिंपळे, 18 कोटी 16 लाख 18 हजार 100), रामदास बाबुराव गुंजाळ (कर्हे, 10 कोटी 67 लाख 29 हजार 760), जगन्नाथ शंकर कोटकर (नवनाथ गोलर) (पिंपळे, 27 कोटी 30 लाख 19 हजार 760), एन. के. गाडे (कर्हे, 25 कोटी 72 लाख 520), वैष्णव राजकुमार मुर्तडक (पिंपळे, 8 कोटी 37 लाख 81 हजार 740), किसन केशव थोरात (पारेगाव खुर्द, 17 कोटी 93 लाख 91 हजार 260), शब्बीर पठाण (भारत रामचंद्र रणमाळे) (कासारे, 22 कोटी 79 लाख 4 हजार 560), सह्याद्री हॉट मिक्सींग (किरण कडु) (16 कोटी 10 लाख 84 हजार 900), सोमनाथ पुंजा गोडसे (माधव जमधडे) (तळेगाव, 41 कोटी 78 लाख 51 हजार 120), अशोक मारुती कोल्हे (पिंपरणे, 14 कोटी 17 लाख 22 हजार 960), विश्वनाथ तुकाम कोटकर (संदीप कानकाटे) (पिंपळे, 12 कोटी 76 लाख 8 हजार 680), इंद्रजित पंडीत थोरात (पिंपळे, 24 कोटी 53 लाख 72 हजार 240), दत्तात्रय बाबुराव कोटकर (पिंपळे, 6 कोटी 24 लाख 67 हजार 700), रावसाहेब रघुनाथ कोटकर (विशाल भुसाळ) (पिंपळे, 1 कोटी 68 लाख 31 हजार 940), सोमेश्वर हरिभाऊ दिवटे (पिंपळे, 20 कोटी 67 लाख 20 हजार 660), भाऊसाहेब सुकदेव कोटकर (26 कोटी 68 लाख 88 हजार 720), संतोष आणि भाऊसाहेब सुखदेव (पिंपळे, 14 हजार 844), आकाश चकोर (शिवशक्ती स्टोन क्रेशर)(1 कोटी 19 लाख 44 हजार 460), दत्तु नामदेव शेळके (पिंपळे, 19 हजार 493), कचरु निवृत्ती चकोर (पिंपळे, 2 कोटी 78 लाख 50 हजार 460), ज्ञानेश्वर हरिभाऊ चकोर (पिंपळे, 2 कोटी 44 लाख 66 हजार 820), माधव भिवसेन मोरे (वडझरी खुर्द, 47 कोटी 1 लाख 81 हजार 860), दत्तु नामदेव शेळकेे (पिंपळे, 14 लाख 46 हजार 500), शोभा भाऊपाटील चकोर (संगिता अरुण चकोर) (पिंपळे, 8 हजार 293), बिरोबा मंडलिक (शिवशक्ती स्टोन क्रशर) (पिंपळे, 11 कोटी 20 लाख 22 हजार 120), सुभाष रावबा गिते (पिंपळे, 43 कोटी 70 लाख 68 हजार 460), असा एकूण 765 कोटी 24 लाख 10 हजार 795 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.