पाचेगावात बंद घराचा दरवाजा तोडून 15 हजाराची चोरी

पाचेगावात बंद घराचा दरवाजा तोडून 15 हजाराची चोरी

पाचेगाव |वार्ताहर| pachegav

नेवासा 9Newasa) तालुक्यातील पाचेगाव (Pachegav) येथे रविवारी पहाटे बंद घराचा दरवाजा तोडून कपाटातील रोख 15 हजार रुपयांची रक्कम चोरीस (stolen) गेल्याची घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, गावातील पुरोहित दिनेश दत्तात्रय कुलकर्णी गावातील गहिनीनाथ महाराज मंदिरा शेजारी पाचेगाव फाटा (Pachegav Phata) रस्त्या लगत भरवस्तीत राहतात. त्यांची दोन्ही मुले नोकरीस असल्याकारणाने ते श्रीरामपूर (Shrirampur) येथे राहतात. दिनेश कुलकर्णी हे पाचेगाव येथील घरातच राहतात.पण शनिवारी सायंकाळी श्रीरामपूर येथे आपल्या मुलांकडे गेलेले होते. घरी कोणी नाही, या संधीचा फायदा घेत रविवारी पहाटे चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करून घरातील सामनाची उचकापाचक करून कपाटात ठेवलेली रोख 15 हजार रुपयांची रक्कम चोरुन नेली.

दरम्यान घटनास्थळी शेवगावाच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे (Shevgaon Sub-Divisional Police Officer Sudarshan Munde) तसेच नेवाशाचे पोलीस निरीक्षक विजय करे (Newasa PI Vijay Kare), पाचेगाव बिट हवालदार शिंदे यांनी भेट दिली. घटनास्थळी काही पायाचे ठसे आढळून आल्याने ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचेगाव बिट हवालदार मोहन शिंदे हे करणार असल्याचे समजते.

चोर हे परिसरातील असल्याचा संशय गावातील नागरिकांनी व्यक्त केला असून घटनेची माहिती पाचेगाव-पुनतगाव येथील पोलीस पाटील संजय वाकचौरे यांनी दिली होती. रविवारी उशीरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

पोलिसांचे वाहन येताच व्यावसायिकांची पळापळ...

चोरीच्या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी पोलिसांचे वाहन गावात येताच गावातील व्यावसायिकांची पळापळ झाली. सर्वांनी पटापट दुकानाची शटर्स खाली घेतली. जनता कर्फ्यू असतानाही दुकाने दुपारी चारनंतरही चालू होती. त्यामुळे कारवाईच्या भीतीने दुकाने बंद करुन सर्वांनी पळ काढला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com