नगरमध्ये गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा जप्त

एमआयडीसीत प्रशासनाची कारवाई
नगरमध्ये गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा जप्त
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सावेडीतील एका मेडिकल एजन्सीच्या नावे एमआयडीसीतील ट्रान्सपोर्ट कंपनीत गर्भपाताच्या गोळ्यांचा मोठा साठा आला होता, तो एमआयडीसी पोलीस व औषध प्रशासनाने जप्त केला आहे. एका पॅकेटमध्ये पाच नग याप्रमाणे 900 कीटमधून साडेचार हजार गोळ्यांचा हा साठा आहे. बिल मात्र दुसर्‍या गोळ्यांच्या नावाचे असल्याने याबाबत संशय व्यक्त होत आहे. यामुळे पोलीस व औषध प्रशासनाने तो साठा जप्त करून तपास सुरू केला आहे. यातून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशिवाय वापरण्यास बंदी असलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा एमआयडीसी परिसरात असल्याची खबर मिळाली होती. यानंतर औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त हेमंत मेतकर, औषध निरीक्षक जावेद शेख, एमआयडीसी ठाण्याचे सहायक निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. एमआयडीसीतील एका ट्रान्सपोर्ट कंपनीत हा साठा आला होता.

सावेडीतील एका मेडिकल एजन्सीच्या नावे या गोळ्यांचे बिल असून, त्याचे बिल मात्र थंडीतापाच्या गोळ्यांचे आहे. एका पॅकेटमध्ये पाच नग याप्रमाणे 900 कीटमधून साडेचार हजार गोळ्यांचा हा साठा आहे. दुसर्‍याच गोळ्यांच्या नावाचे बिल असल्याने याबाबत संशय व्यक्त होत आहे. वैद्यकीय सल्ल्याशिवाय होणार्‍या गर्भपातासाठी या गोळ्यांचा प्रामुख्याने वापर होत असल्याने मेडिकल दुकानांत छुप्या पद्धतीने विक्री करण्यासाठीच हा साठा आल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

एमआयडीसीतील एका ट्रान्सपोर्ट कंपनीतून गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा जप्त केला आहे. त्यातील नमूने औरंगाबाद येथील शासकीय लॅबोरेटरीकडे पाठविले आहेत. बिल एक असून माल दुसरा आला असल्याने आम्ही संबंधीतांकडे तपास सुरू केला आहे.

- जावेद शेख, औषध निरीक्षक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com