धक्कादायक : आई-वडिलांनी अल्पवयीन मुलीला अमानुष मारहाण करून काढले घराबाहेर

चाईल्ड लाईनकडून दखल, पोलिसात फिर्याद
धक्कादायक : आई-वडिलांनी अल्पवयीन मुलीला अमानुष मारहाण करून काढले घराबाहेर

अहमदनगर|Ahmedagar

अल्पवयीन मुलीला मारहाण (Beating a minor girl) करून घराच्या बाहेर काढलेल्या सावत्र आई (Stepmother) व वडिलाविरोधात (Father) तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे. ललिता तिरथ दिव्यांका व तिरथ दिव्यांका (रा. तपोवन रोड) असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नावे आहेत. चाईल्ड लाईनच्या (Child line) कर्मचार्‍यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलगी (Minor Girl) मधु दिव्यांका हिची आई-वडिलांच्या ताब्यातून सुटका झाली आहे. चाईल्ड लाईनचे (Child line) सदस्य प्रवीण कदम यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पाच ते सहा दिवसांपासून एक अल्पवयीन (Minor Girl) मुलगी तपोवन रोड (Tapovan Road) परिसरात बेवारस अवस्थेत फिरत आहे. तिच्या शरीराला जखमा सुद्धा आहे, असा फोन चाईल्ड लाईनला (Child line) आला. चाईल्ड लाईनचे प्रवीण कदम आणि प्रियंका गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. तिच्याकडे विचारणा केल्यानंतर तिने त्यांना सांगितले की, माझी सावत्र आई (Stepmother) दारू पिऊन दररोज मला मारत असते, अंगाला चटके देत असते, जेवण देत नाही, घरा बाहेर काढते. मागील पाच दिवसापूर्वी आईने खूप दारू पिऊन मला लाटण्याने डोक्याला, हाताला, डोळ्याला मारले होते. या कारणाने मी घरातून निघून आले. तेव्हापासून मी असेच फिरत आहे आणि जे काही मिळेल ते मी खात आहे, अशी व्यथा त्या मुलीने चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधीसोबत व्यक्त केली.

याबाबत त्यांनी तोफखाना पोलिसांना (Topkhana Police) माहिती दिली. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी उपनिरीक्षक सुरज मेढे, पोलीस कर्मचारी शिरीष तरटे, महिला कर्मचारी गहिले यांना घटनास्थळी पाठविले. चाईल्ड लाईनचे (Child line) कदम यांच्या फिर्यादीवरून मारहाण (Beating) करणार्‍या आई-वडिलांविरोधात (Against parents) भादंवि कलम 317, 324, बाल न्याय (काळजी आणि संरक्षण) अधिनियम 2015 अन्वये कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक महेश सूर्यवंशी, बालकल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख व सदस्य बागेश्री जरंडिकर व बाल कल्याण समितीच्या आदेशाने सदर अल्पवयीन मुलीला स्नेहालय (Snehalaya) संचलित केडगाव येथील स्नेहांकुर या दत्तक विधान केंद्रात तात्पुरत्या स्वरूपाचा निवारा मिळवून देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com