बांधकामावरून स्टिल चोरणारी टोळी जेरबंद

शहर पोलिसांनी 1 हजार 300 किलो स्टिलसह सात आरोपींच्या मुसक्या आवळल्या
बांधकामावरून स्टिल चोरणारी टोळी जेरबंद

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहर परिसरात धुमाकूळ घालणार्‍या स्टील चोरणार्‍या टोळीच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. टोळीतील आरोपी खडकी तालुका कोपरगाव येथील असून टोळीतील सात जणांकडून 1 हजार 300 किलो स्टील, एक दुचाकी, एक अपे रिक्षा असा साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी गटया उर्फ विशाल राजेंद्र शिंदे, दीपक अर्जुन दवंगे, मुकेश मुनीर शेख, सोमनाथ भाऊलाल सुरासे, मुकुंदा ज्ञानेश्वर पवार, पवन रमेश भालेराव, आकाश अंकुश खरात सर्व राहणार खडकी तालुका कोपरगाव अशी अटकेतील सात स्टील चोरांची नावे आहेत. कोपरगाव शहर पोलिसांमध्ये राजेश शांतीलाल कोकणी यांनी साई सिटी येथील बांधकामावरून पंधराशे किलो स्टील चोरी, कचरू भास्कर निकम यांनी गवारे नगर येथील बांधकामावरून 170 किलो स्टील तर नीरज मदनलाल कासलीवाल सरकारवाडा सराफ बाजार येथून 350 किलो स्टील चोरीला गेल्याच्या तक्रारी शहर पोलीस स्टेशनला दाखल झाल्या होत्या.

या प्रकरणाचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू पुंड व पोलीस कॉन्स्टेबल सुरज अग्रवाल यांच्याकडे होता. पोलिसांना गुप्त खबर्‍याद्वारे माहिती मिळाली, गटया उर्फ विशाल राजेंद्र शिंदे कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या खडकी येथे आहे. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांने सहा साथीदारांची नावे सांगितली. साईसिटी येथील काटवनात लपविलेले स्टील पोलिसांना दाखविले. पोलिसांनी या सात जणांच्या ताब्यातून तेराशे किलो स्टील, एक दुचाकी, एक अ‍ॅपे रिक्षा असा साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक वासुदेव देसले मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू पुंड व पोलीस कॉन्स्टेबल सुरज कुमार अग्रवाल यांनी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com