शनिवार व रविवार कळसूबाई, हरिश्चंद्रगड, भंडारदरा पर्यटनासाठी बंद

शनिवार व रविवार कळसूबाई, हरिश्चंद्रगड, भंडारदरा पर्यटनासाठी बंद

परिसरातील गावांचा ठराव

अकोले |प्रतिनिधी| Akole

आदिवासी भागात (tribal areas) करोनाचे संक्रमण (Corona) टाळण्यासाठी 'कळसुबाई हरिश्चंद्रगड -अभयारण्य' (Kalsubai Harishchandragad - Sanctuary) येत्या शनिवारी-रविवारी (Saturday-Sunday) पर्यटक व ट्रेकर्स यांना पर्यटनासाठी बंद (Closed for tourism) राहणार आहे. शेंडी वन विश्रामगृह येथे कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील लोकप्रतिनिधी सरपंच, पोलिस पाटील, वन समिती यांचे अध्यक्ष सदस्य वन अधिकारी कर्मचारी व पोलिस अधिकारी कर्मचारी यांची झालेल्या सभेत हा निर्णय (decision in the meeting) घेण्यात आला.

करोनाच्या तिसर्या लाटेचा (third wave of the corona) महाराष्ट्राला (Maharashtra) असणारा धोका आणि डेल्टा प्लस (Delta Plus) सारख्या आजाराचे राज्यात सापडलेले रूग्ण (State Patient) या सर्वांचा विचार करत महाराष्ट्र शासनाने राज्यात कडक नियमावली केली असुन संपूर्ण राज्यात जमाव बंदिचे आदेश (Crowd ban orders in the state) लागु केले आहेत व गर्दिची ठिकाने बंद करण्याचे देखिल आदेश दिले आहेत. याचाच फटका पर्यटनाला देखिल चांगलाच बसला असुन आदिवासी भागात करोनाचे संक्रमण टाळण्यासाठी अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील भंडारदरा पर्यटन (Bhandardara Tourism) सरकारच्या गाईड लाइन नुसार शनिवारी व रविवारी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर कळसुबाई शिखर (Kalsubai peak) हे पुर्णपणे बंदच राहणार असल्याचे बारी गावचे सरपंच तुकाराम खाडे (Sarpanch Tukaram Khade) यांनी सांगितले आहे तर भंडारदरा देखिल शनिवारी व रविवारी बंद राहणार असुन पुढची परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येथिल आसे भंडारदरा गावचे सरपंच पांडुरंग खाडे यांनी सांगितले आहे.

यामुळे या ठिकाणचे पर्यटनावर अवलंबून आसलेले सुशिक्षित बेरोजगार तरूण (Educated unemployed youth) मात्र देशोधडीला लागनार असुन आधीच दिड वर्षांपासून याठिकाणचा व्यवसाय लॉकडाऊन मुळे बंद होता. आणि आताच कही दिवसा पुर्वी संपूर्ण निर्बंध हटवल्याने या तरुणांनी पुन्हा एकदा आपला व्यवसाय सुरू केला होता. यासाठी कोणी उधार पैसे घेतले तर अनेकांना बँकतुन कर्जघेतले (Bank Loan)आहे. मात्र राज्यात पुन्हा तिसरी लाटेची शक्यता असल्याने राज्य शासनाने कडक निर्बंध लावत जमाव बंदीचे आदेश पारित केल्याने याचा पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. तेव्हा सरकारने आमच्याकडे पण लक्ष द्यावे असे भंडारादरा परिसरातील व्यावसायिकांनी केली आहे. पर्यटकांनी शनिवारी व रविवारी भंडारदरा या ठिकाणी येऊ नये आशी विनंती देखिल केली आहे. या वेळी वनक्षेत्रपाल डी डी पडवळ व अमोल आढे यांनी मार्गदर्शन केले.

कळसूबाई, हरिश्चंद्र,रतनवाडी, सम्राद,रतनगड या परिसरात करोणा संक्रमण होऊ नये याची काळजी घेण्यासाठी शनिवार रविवार या दिवशी पर्यटक यांना बंदी घालण्यात आली असून नियम मोडणाऱ्या पर्यटक यांचेवर कारवाई केली जाईल .

- गणेश रनदिवे, सहायक वनसंरक्षक.

रस्त्यावर उतरणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल.

- नरेंद्र साबळे, सहायक पोलीस निरीक्षक, राजूर

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com