कृषी विद्यापिठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी कुलगुरुंना अभाविपच्यावतीने निवेदन

कृषी विद्यापिठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी कुलगुरुंना अभाविपच्यावतीने निवेदन

आंबी (वार्ताहर) / Ambi - मागील 15 महिन्यांपासून संपूर्ण जगात करोना (coronavirus) महामारीचा प्रादुर्भाव आहे. या महामारीमुळे शैक्षणिक क्षेत्रावर सुद्धा खूप विपरीत परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी आर्थिक स्थिती खराब झाली आहे. त्या अनुषंगाने अभाविपच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (Mahatma Phule Krishi Vidyapeeth (MPKV)) येथे कुलगुरूंना दिले.

ज्या विद्यार्थ्यांचे पालक करोनामुळे मयत झाले आहेत. अशा सर्व कृषी विद्यार्थ्यांच्या पदवी व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण होईपर्यंत संपूर्ण फी माफ करण्यात यावी, शैक्षणिक वर्ष 2020-21 पूर्णपणे ऑनलाईन पध्दतीने पार पडले आहे. तरीही सर्व कृषी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून ग्रंथालय, प्रयोगशाळा, जिमखाना, डेव्हलपमेंट शुल्क हे अनावश्यक शुल्क आकारले आहेत, ते कृषी विद्यार्थ्यांना तत्काळ परत मिळावेत. विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारे वसतिगृहाचा वापर केलेला नाही, त्यामुळे वसतिगृह शुल्क माफ करण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या

यावेळी करोनाच्या पार्श्‍वभूमीवर विविध विद्यार्थी हिताच्या प्रलंबित प्रश्‍नांवर चर्चा करून सदर विषय विद्यापीठ प्रशासनाने तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी अभाविप उत्तर नगरच्यावतीने केली. कुलगुरू यांनी सर्व विषयांबाबत सकारात्मकता दाखवली आहे. वरील सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा अभाविप कृषी विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असे उत्तर नगर अभाविप जिल्हा महाविद्यालय प्रमुख प्रफुल्ल प्रकाश खपके यांनी सांगितले. यावेळी ओमकार खपके, निखिल कुलकर्णी, जीतेश साळुंके, संतोश तांबे, महेश खपके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com