'भुईकोट'ला 5 कोटींची झळाळी

सुशोभिकरणासाठी निधीचा पहिला हा प्रशासनाकडे वर्ग
'भुईकोट'ला 5 कोटींची झळाळी

अहमदनगर (प्रतिनिधी)

भुईकोट किल्ला (Bhuikot fort) कात टाकण्यासाठी सज्ज झाला असून राज्य शासनानेही डागडुजी, सुशोभिकरणासाठी राज्याच्या पर्यटन विभागाने (Department of Tourism) ५ कोटींचा निधी मंजूर केला असून त्यापैकी ९० लाखांचा पहिला हप्ता प्रशासनकडे वर्ग केला आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या कामांमुळे हा ऐतिहासीक ठेवा पर्यटकांना आपल्याकडे आकर्षून घेण्यासाठी अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा इतिहासप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

नगर शहराला सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक वारसा आहे. हा वारसा जतन करण्यासाठी सरकारने एक पाऊल टाकले आहे. सुशोभीकरणाच्या माध्यमातून नगर शहराच्या पर्यटन वाढीला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पर्यटन विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे यासाठी स्थानिक आमदार संग्राम जगताप (mla sangram jagtap) यांनी पाठपुरावा केला होता.

पर्यटन मंत्र्यांनी भुईकोट किल्ला सुशोभिकरणसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ९० लाखाचा पहिला हप्ता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. यातून भुईकोट किल्ल्याची संरक्षण भिंत, किल्ला परिसर स्वच्छता, पार्किंग शेड, अंतर्गत प्रसाधनगृह, पाथवे दुरुस्ती व पुरातन काळातील खापरी पाइपलाइनची दुरुस्ती तसेच लॉन सुशोभीकरण, अंतर्गत रस्त्यांची कामे, किल्ला परिसरातील इमारतींची दुरुस्ती, विद्युतीकरण आदी कामे होणार आहेत, अशी माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com