मंदिरे न उघडल्यास रस्त्यावर उतरू : अण्णा संतापले!

दहा दिवसांत निर्णय न झाल्यास जेलभरो आंदोलन
अण्णा हजारे
अण्णा हजारे

अहमदनगर/ पारनेर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी (State Temple Open) सरकारला काय अडचण आहे ? दारूची दुकाने, हॉटेल सर्व उघडी केली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून (Crowd) करोना वाढत नाहीये का ? जेथून मिळणार्‍या सात्विक विचारातून माणसे घडत आहेत अशा मंदिरांना बंद करून सरकारने (Government) काय मिळवले ? असा सवाल करताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) संतापले (Angry). मंदिरे उघडण्यासाठी (Temple Open) जनतेने आता रस्त्यावर उतरले पाहिजे. मंदिर बचाव कृती समितेने यासाठी मोठे आंदोलन उभारावे. यात मी स्वतः सहभागी होईल. सरकारचे धोरण बरोबर नाहीये. 10 दिवसात जर मंदिर उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला नाहीतर मोठे जेल भोरो आंदोलन (Movement) करा मी तुमच्या बरोबर राहील, असा इशाराही (Hint) अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी दिला.

नगरच्या मंदिर बचाव कृती समितीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांची राळेगणसिद्धी (Ralegansidhi) येथे भेट घेवून राज्यातील बंद असलेली सर्व मंदिरे उघडण्यासाठी (Temple Open) सरकारकडे पाठपुरावा (Follow up with the government) करावा असे साकडे घातले. मंदिर बचाव कृती समितीच्या शिष्ठमंडळात मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, श्री शिव प्रतिष्ठानचे बापू ठाणगे, बाळासाहेब खताडे, गणेश पलंगे आदी उपस्थित होते. यावेळी हजारे पुढे म्हणाले, भरकटत चालेल्या समाजाला फक्त मंदिरेच तारू शकतात यावर माझा विश्वास आहे.

मी आज जे काही आहे ते केवळ मंदिरामधून मिळालेल्या संस्कारामुळेच आहे. आज 84 वय झाले आहे. मात्र माझ्यावर एवढासाही कोणताच डाग नाहीये. हा मंदिरातून मिळालेल्या संस्काराचा परिणाम आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या समाधी जवळ जाऊन तुळशीची माळ घालून वारकरी झालोय. संतांचे विचार देणारे मंदिरे का बंद केली. सरकारला संतांचे विचार काय समजले ? त्यामुळे सरकाने आपले धोरण बदलावे व त्वरित मंदिरे उघडावीत. निवेदनावर विशाल गणपती मंदिराचे अध्यक्ष अभय अगरकर (Abhay Agarkar) व शिर्डी साईबाबा देवस्थानचे माजी ट्रस्टी सचिन तांबे यांच्या सह्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com