नेवासा| Newasa| सुखदेव फुलारी

नेवासा-यंदाचे सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामात राज्यातील 189 साखर कारखान्यांनी 29 मार्च 2021 अखेर 957.66 लाख मेट्रिक टन

ऊसाचे गाळप करून 1000.71 लाख क्विंटल (10 कोटी 71 लाख टन) साखर उत्पादित केली आहे.राज्याचा सरासरी साखर उतारा 10.45 टक्के आहे. 101 साखर कारखान्यांचे गळीत हंगाम बंद झाले आहेत.

सर्वाधिक ऊस गाळप कोल्हापूर विभागाचे 227 लाख टन झाले असून या विभागातील कारखान्यांनी 272 लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. सर्वाधिक उतार्यातही कोल्हापूर पहिल्या स्थानावर असून कोल्हापूर विभागाचा उतारा जवळपास 12 टक्के (11.96) इतका आहे.

या विभागातील 30 कारखान्यांची धुराडी आता थांबली आहेत. नागपूर विभागात सर्वात कमी 4 लाख टन उसाचे गाळप झाले असून या विभागात अवघी 3 लाख 61 हजार क्विंटल साखर उत्पादीत झाली. उतारा 9 टक्के निघाला. सर्वात कमी उतारा अमरावती विभागाचा (8.93 टक्के) आहे.

नगर जिल्ह्यातील 22 कारखान्यांकडून 1 कोटी 38 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप

नगर जिल्ह्यातील 14 सहकारी व 8 खाजगी अशा एकूण 22 साखर कारखान्यांनी 29 मार्च 2021 अखेर 1 कोटी 37 लाख 98 हजार 692 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 1 कोटी 34 लाख 23 हजार 415 क्विंटल साखर निर्मिती केली आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा 09.73 टक्के आहे.

जिल्ह्यात अंबालिका कारखान्याचे 15 लाख 77 हजार 255 टन इतके सर्वाधिक गाळप झाले. सहकारी कारखान्यात ज्ञानेश्वरचे गाळप (12 लाख 7 हजार 665 टन) सर्वाधिक आहे. जिल्ह्यात सर्वाधिक उतारा श्रीगोंदा कारखान्याचा (10.82 टक्के) आहे. पियुष कारखान्याचा उतारा सर्वात कमी (7.55 टक्के) आहे.

नगर जिल्ह्यातील एकूण 1 कोटी 37 लाख 98 हजार 692 मेट्रिक टन ऊसापैकी 14 सहकारी साखर कारखान्यांनी 92 लाख 56 हजार 433 मेट्रिक टन तर 8 खाजगी साखर कारखान्यांनी 45 लाख 42 हजार 258 मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण केलेले आहे.

नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यानी 29 मार्चअखेर केलेले ऊस गाळप, साखर उत्पादन व साखर उतारा

अ.नं. कारखाना ऊस गाळप साखर उत्पादन उतारा

मे. टन क्विंटल टक्के

1) ज्ञानेश्वर 12,07,665 12,65,550 10.48

2) मुळा 10,96,920 10,15,550 9.26

3) संजीवनी 7,03,216 6,44,150 9.16

4) कोपरगाव 5,97,814 6,18,900 10.35

5) अशोक 5,92,230 5,09,050 8.60

6) कुकडी 6,69,650 6,74,200 10.07

7) संगमनेर 11,39,690 11,41,820 10.02

8) अंबालिका 15,77,255 16,58,350 10.51

9) गंगामाई 10,73,230 9,81,900 9.15

10) वृद्धेश्वर 4,04,750 4,23,975 10.47

11) अगस्ती 5,25,651 5,60,480 10.66

12) केदारेश्वर 3,50,950 2,98,450 8.50

13) क्रांती शुगर 1,78,720 1,86,850 10.45

14) साईकृपा नं 12,81,640 2,90,000 10.3

15) प्रसाद शुगर 6,21,640 6,30,050 10.14

16) गणेश 2,73,727 2,29,025 8.37

17) प्रवरा 7,99,070 6,29,350 7.88

18) श्रीगोंदा 6,90,680 7,47,225 10.82

19) पियुष 1,78,222 1,34,550 7.55

20) जय श्रीराम 2,41,111 2,07,140 8.59

21) युटेक 3,90,440 3,93,900 10.09

22) राहुरी 2,04,400 1,82,950 8.95

एकूण 1,37,98,692 1,34,23,415 9.73