राज्यात सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरु
File Photo

राज्यात सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरु

मागील अभ्यासक्रमाच्या क्षमतांचे होणार भरण

संगमनेर |वार्ताहर| Sangmner

मागील वर्षी करोना विषाणूचा प्रादुर्भाव (Outbreak of Corona virus) झाल्यामुळे संपूर्ण वर्षभर प्रत्यक्ष शाळा सुरू होऊ शकलेली नाही (actual school could not be started throughout the year). त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान (Educational loss of students) झाले आहे. हे गृहीत धरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (State Council for Educational Research and Training) वतीने नव्या शैक्षणिक वर्षात सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी (Implementation of Setu course) सुरू करण्यात आली आहे. 1 जुलैपासून राज्यात सर्वत्र या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली आहेत.

करोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान (Educational loss of students) झाल्याचे लक्षात घेऊन इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मागील इयत्तेच्या शिकवल्या जाणार्‍या विविध विषयांच्या पायाभूत संकल्पना अधिक दृढ व्हाव्यात यासाठी सेतू अभ्यासक्रमाची (Setu course) निर्मिती करण्यात आली आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी परिषदेच्यावतीने अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. त्या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी एक जुलै ते 14 ऑगस्ट या कालावधीत राज्यात अंमलबजावणी होणार आहेत.

पीडीएफ स्वरूपात पुस्तिका

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदच्या वतीने विकसित करून देण्याचा आलेला अभ्यासक्रमाचा पुस्तिका या परिषदेच्या संकेतस्थळावर ती पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या पुस्तिका शिक्षक ,पालक व विद्यार्थी यांना मोफत उपलब्ध असणार आहेत. सध्या ऑनलाइन शाळा सुरू करण्यात आल्या असून काही ठिकाणी गृहभेटी किंवा इतर पर्यायी मार्ग वापरण्यात येत आहेत. या सर्व प्रक्रियेद्वारे सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरी ते अध्ययन करणार्‍या विद्यार्थ्यांना नियमित जे विषय शिकविले जातात. त्या सर्व विषयांच्या पुस्तिका उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.

अध्ययन निष्पत्तीचे होणार भरण

केंद्र सरकारने प्रत्येक इयत्तेच्या व विषयासंबंधी ने अध्ययन निष्पत्ती निश्चित केलेल्या आहेत. त्या प्रत्येक विद्यार्थ्याला साध्य व्हाव्यात यासाठी अभ्यासक्रमातून अध्ययन अनुभव देण्याची गरज व्यक्त असते. मात्र प्रत्यक्ष शाळा सुरु न झाल्यामुळे अध्ययन अनुभव देण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन संबंधित इयत्तेच्या अध्ययन निष्पत्ती साध्य व्हाव्यात यासाठी सेतू अभ्यासक्रमात विचार करण्यात आला आहे. त्याचबरोबर अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांना क्षमता प्राप्त झाल्या आहेत किंवा नाही हे मूल्यमापनाच्याद्वारे पडताळून पाहण्यात येणार आहेत.

सेमी माध्यमासाठी लवकरच सेतू अभ्यासक्रम

राज्यात मराठी, उर्दू, इंग्रजी माध्यमासाठी सेतू अभ्यासक्रमाच्या पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सेमी अभ्यासक्रमासाठी च्या अभ्यासक्रम पुस्तिका उपलब्ध झालेल्या नाहीत. त्याही येत्या काही दिवसात उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले .त्यावरती काम सुरू असून येत्या काही दिवसात त्या पालक, शिक्षक विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.

खासगी प्रकाशकांचा जोरदार धंदा

राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने मोफत सेतू अभ्यासक्रमाच्या पीडीएफ उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. मात्र ते पीडीएफ उपलब्ध होताच खाजगी प्रकाशकांनी त्याची छपाई करून समाज माध्यमात जाहिराती सुरू केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी स्वतंत्र वहीत सोडविला तरी चालणार आहे असे सांगण्यात आल्याचे समजते. त्यामुळे विकत घेण्याची सक्ती असणार नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com