अकोले येथे किसान सभेचे राज्य अधिवेशन सुरू

केंद्रीय नेतृत्वासह राज्यभरातून प्रतिनिधी सहभागी; ओला दुष्काळप्रश्नी तीव्र आंदोलनाचे नियोजन करणार
अकोले येथे किसान सभेचे राज्य अधिवेशन सुरू

अकोले (प्रतिनिधी)

अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाला आजपासून अकोले येथे सुरुवात झाली.

31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर असे तीन दिवस चालणाऱ्या अधिवेशनासाठी किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष, डॉ. अशोक ढवळे, केंद्रीय कोषाध्यक्ष पी. कृष्णप्रसाद, किसान सभेचे नेते आ.जे.पी. गावीत, किसन गुजर, डॉ. अजित नवले यांच्यासह 65 राज्य कौन्सिल सदस्य व महाराष्ट्रभरातून 23 जिल्हा अधिवेशनांमध्ये निवडण्यात आलेले 300 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

सलग तीन दिवस ओला दुष्काळ, शेती संकट व ज्वलंत शेतकरी प्रश्नांवर विचार विनिमय करून शेतकरी आंदोलनाच्या वाटचालीची पुढील दिशा निश्चित करणार आहेत.

अधिवेशनापूर्वी आज सोमवारी दुपारी शेतकऱ्यांची भव्य रॅली संपन्न झाली. बाजारतळ अकोले येथून निघालेल्या या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी, ग्रामीण श्रमिक व ग्रामीण कामगार सहभागी झाले.

शेतकरी रॅलीनंतर येथील महालक्ष्मी मंगल कार्यालय येथे जाहीर सभा घेण्यात आली. सभेला डॉ. अशोक ढवळे, पी. कृष्णप्रसाद, जे.पी.गावीत, आ. विनोद निकोले, किसन गुजर, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख व अर्जुन आडे यांनी संबोधित केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com