पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवा

राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचना
पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) बळकट करण्यासाठी सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रीय होण्याची गरज आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे (NCP) कार्य उत्तमपणे सुरू असून, पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करावा. भविष्यातील निवडणुका (Election) समोर ठेऊन कामाला लागण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील (State President and Water Resources Minister Jayant Patil) यांनी दिले.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त राष्ट्रवादी भवन (Nationalist Building) येथे प्रदेशाध्यक्ष पाटील (Minister Jayant Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या आढावा बैठकित जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व सर्व सेलच्या पदाधिकार्‍यांनी केलेल्या कार्याचा लेखाजोखा मांडला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Minister Jayant Patil) यांनी जिल्हा राष्ट्रवादीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके (District President Rajendra Phalke) यांनी स्वागत केले.

पक्षनिरीक्षक अंकुश काकडे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, आ. किरण लहामटे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, दादा कळमकर, माजी आ. नरेंद्र घुले, संदीप वर्पे, संजय कोळगे, कपिल पवार, गजेंद्र भांडवलकर, किसनराव लोटके, पांडुरंग अभंग आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच सर्व सेलच्या अध्यक्षांनी आपल्या कार्याचा अहवाल सादर केला.

Related Stories

No stories found.