शिक्षकेतर कर्मचार्‍यांना शिक्षकपदी पदोन्नतीबाबत शिक्षण आयुक्तांची तातडीची बैठक घेणार - सुरासे

शिक्षकेतर कर्मचार्‍यांना शिक्षकपदी पदोन्नतीबाबत शिक्षण आयुक्तांची तातडीची बैठक घेणार - सुरासे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचार्‍यांना शिक्षकपदी पदोन्नती बाबत शिक्षण आयुक्तांबरोबर तातडीची बैठक घेणार असून, राज्यातील माध्यमिक शिक्षकेतर यांचे उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांना योग्य तो न्याय मिळवून देऊ, अशी ग्वाही राज्य शिक्षकेतर महामंडळाचे अध्यक्ष वाल्मीक सुरासे यांनी आयोजित बैठकीत दिले.

अहमदनगर जिल्हा माध्यमिक शाळा पुरोगामी शिक्षकेतर संघटनेची बैठक अहमदनगर येथील माध्यमिक शिक्षक भवन येथे संघटनेचे जिल्हाध्यक्ष पाराजी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य शिक्षकेतर महामंडळाचे अध्यक्ष वाल्मीक सुरासे यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

याप्रसंगी प्रास्ताविकात संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक समशेर पठाण यांनी महामंडळाचे अध्यक्ष वाल्मीक सुराशे हे मंत्री स्तरावर शिक्षकेतर यांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात वेळोवेळी बैठका घेऊन शासनाचे लक्ष वेधत आहेत. प्रलंबित प्रश्नांसाठी वेळप्रसंगी सर्वांनीच राज्य शिक्षकेतर महामंडळाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन समशेर पठाण यांनी यावेळी केले.

पुरोगामी शिक्षकेतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष पाराजी मोरे यांनी गेल्या अनेक वर्षापासून माध्यमिक स्तरावरील शिक्षकेतर कर्मचार्‍यांची भरती बंद आहेत. अनेक पदे रिक्त असल्यामुळे शिक्षकेतर कर्मचार्‍यांवर कामाचा प्रचंड भार वाढलेला आहे. त्यातून शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर बनत चालला आहे. आंदोलने करून देखील शासन शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. ही गंभीर बाब असल्याचे स्पष्ट केले. विनायकराव कुलकर्णी यांनी माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे शैक्षणिक क्षेत्रात लाभलेले योगदान याबरोबरच राज्यातील शिक्षकेतर यांचा न्यायालयीन निकालात निघालेला प्रश्न ,शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे पदोन्नती रिक्त पदे, कालबद्ध पदोन्नती कर्तव्य आणि जबाबदार्‍या प्रश्न आदी विषयांवर मार्गदर्शन केले.

या बैठकी दरम्यान शिक्षक परिषदेचे नेते व माध्यमिक शिक्षक सोसायटीचो संचालक बाबासाहेब बोडखे, शिक्षक संघाचे सचिव आप्पासाहेब शिंदे, माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव व माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक आप्पासाहेुब शिंदे, जुनी पेन्शन कोअर समितीचे महिंद्र हिंगे, सुनील दानवे यांनी बैठकीदरम्यान हजेरी लावून पुरोगामी शिक्षकेतर संघटनेच्या कार्याचे कौतुक करून शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी या पदाधिकार्‍यांनी दिले.

या बैठकीस प्रास्ताविकात पुरोगामी जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर संघटनेचे सचिव भाऊसाहेब धनवटे, यांनी वाटचालीची माहिती यावेळी विशद केली .याप्रसंगी बैठकीत राज्य शिक्षकेतर महामंडळाचे उपाध्यक्ष राजू पठाण आसाराम शेळके, औरंगाबाद जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे राजेंद्र बाविस्कर, सहसचिव तोफिक शेख, गोरक्षनाथ दहिमीवाल, संग्राम म्हस्के, गणेश पोकळे, नारायण ढाकणे, नेवासा तालुका पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सत्यवान कांबळे, पाथर्डी तालुका अध्यक्ष बाळासाहेब खेडकर, नगर तालुका शिक्षकेतर संघटनेचे सचिव जालिंदर शेळके, गुलदगड नंदकुमार कुरुमकर ,ज्ञानोबा खोरदे, शिदोरे ,आदींसह अहमदनगर जिल्हा पुरोगामी शिक्षकेतर संघटनेचे जिल्हा व तालुका पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com