जिल्ह्यातील ‘या’ ग्रामपंचायतीला 20 लाखांचा राज्यस्तरीय व्दितीय पुरस्कार

संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान
जिल्ह्यातील ‘या’ ग्रामपंचायतीला 20 लाखांचा राज्यस्तरीय व्दितीय पुरस्कार

लोणी (वार्ताहर) / Loni - केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रशासकीय व्यवस्थापनाचा उत्कृष्ट दर्जा व गावात स्वच्छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे सन 2017-18 मधील संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियाना (Sant gadgebaba gram Swachata Abhiyan) अंतर्गत लोणी बुद्रूक ग्रामपंचायतीला राज्यात व्दितीय क्रमांकाचा 20 लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला असून, मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते उद्या गुरुवार दि.1 जुलै रोजी दुपारी 1 वा. ऑनलाईन पध्दतीने या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

ग्रामीण भागाच्या विकासात पंचायत राज संस्थांचे योगदान मोठे आहे. ग्रामीण विकासाच्या सर्व योजना पंचायतराज संस्थामार्फत राबविल्या जातात. लोणी बुद्रूक ग्रामपंचायतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची केलेली अंमलबजावणी तसेच ग्राम स्वच्छता व विविध राबविलेले सामाजिक उपक्रम यामुळे राष्ट्रीय व राज्य स्तरावर ग्रामपंचायतीला 20 लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. करोना संकटाचे गांभिर्य लक्षात घेता अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी केंद्रात हा पुरस्कार वितरण समारंभ ऑनलाईन पध्दतीने संपन्न होणार आहे.

ग्रामपंचायतीला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा बँकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामविकास आधिकारी श्रीमती कविता आहेर व सर्व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com