कर्जत |तालुका प्रतिनिधी| Karjat

कायदा व सुव्यवस्था सांभाळणार्या पोलीस वसाहतींची खुप दयनीय अवस्था आहे. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात पोलिसांच्या घरासाठी सुमारे 400 कोटींची तरतूद केली आहे.

आघाडी सरकारने पोलिसांचा ताण कमी करण्यासाठी 5 हजार 500 पोलिसांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे, आघाडी सरकार कायम कर्जत, जामखेडच्या पाठीशी राहील, असे गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई यांनी कर्जत येथे पोलीस वसाहतीच्या भूमिपूजन समारंभात सांगितले.

मंत्री देसाई म्हणाले, पोलीस कर्मचारी बळजबरी करूनही अशा असुविधा असलेल्या ठिकाणी काम करण्यास तयार होत नाहीत. मतदारसंघासाठी काम कसे करायचे हे आ. रोहित पवारांकडून शिकण्यासारखे आहे. अगदी जिल्हा पोलीस अधीक्षकांचे काम असले तरी ते आ. पवारांना सांगा तिथे माझ्या मध्यस्थीचीही गरज भासणार नाही. आ. पवारांच्या माध्यमातून पोलीस बांधवांच्या अडचणी सोडवण्याचे प्रयत्नशील पाऊल पडत आहे. मतदारसंघात सी. सी. टी. व्ही.ची केलेली मागणी असो किंवा ज्या ज्या योजना घेऊन येतील त्याला मंजुरी देण्याची ग्वाही देतो, असे सांगितले.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले, आजचा दिवस पोलीस कुटुंबियांसाठी आनंदाचा क्षण आहे. त्यांच्या घराचे स्वप्न आज पूर्ण होणार आहे. दोन पोलीस अधिकारी आणि 36 पोलीस कर्मचार्यांसाठी निवासस्थाने साकार होणार आहेत. आभार पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी मानले.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सौरव अग्रवाल, बाळासाहेब साळुंके, राजेंद्र दळवी, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, सभापती अश्विनी कानगुडे, पोलीस गृहनिर्माणच्या दीपाली भाईक, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, बळीराम यादव, दीपक शहाणे, पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तहसीलदार नानासाहेब आगळे, बारामती अॅग्रोचे राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.