अवैध दारूवर कडक कारवाई करा - ना. देसाई

राज्य उत्पादन शुल्कच्या नगर कार्यालयाचा आढावा
अवैध दारूवर कडक कारवाई करा - ना. देसाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अवैध दारू निर्मिती, विक्री करणार्‍यांवर वचक बसावा यादृष्टीने कामकाज करणे आवश्यक असून जिल्ह्यात पोलीस विभागाच्या धर्तीवर खबर्‍याचे जाळे तयार करावे. जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये अवैध दारू निर्मिती व विक्री होते त्या ठिकाणी कडक कारवाई करून ते बंद करावे, अशा सूचना राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या आहेत.

येथील शासकीय विश्रामगृहात राज्य उत्पादन विभागाच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त अनिल चाचकर, अधीक्षक गणेश पाटील, उपअधीक्षक नितेश शेंडे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाला दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक त्या पायाभुत सुविधा शासनातर्फे उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाहीही मंत्री देसाई यांनी दिली.

ते म्हणाले, ज्या ठिकाणाहून अवैध दारूची वाहतूक होते तेथे भरारी पथकाव्दारे तात्काळ कारवाई करण्यात यावी. जिल्ह्यात अवैधरित्या मद्य निर्मिती व विक्रीला आळा घालण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, राज्य उत्पादन शुल्क, विभागाच्या विविध कार्यप्रणालीमध्ये अत्याधुनिक साधनसामग्रीचा वापर करण्याबाबतही त्यांनी यावेळी सूचना दिल्यात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com