
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
61 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नगर केंद्रातून रंगकर्मी प्रतिष्ठानच्या ‘एका उत्तराची कहाणी या नाटकाला प्रथम, अहमदनगर जिल्हा हौशी नाटय संघाने सादर केलेल्या ‘म्हातारा पाऊस’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.
‘एका उत्तराची कहाणी’ हे नाटक दिव्यांगांच्या शारीरिक गरजेवर आधारीत होते, तर म्हातारा पाऊस हे नाट्य एका गरीब दाम्पत्याच्या भावनेवर सादर झाले होते. अहमदनगर फिल्म फाउंडेशनच्या ‘धन्वंतरी’ या नाटकास तृतीय पारितोषिक मिळाले.
अन्य निकाल पुढीलप्रमाणे -
दिग्दर्शन : प्रथम - कृष्णा वाळके (म्हातारा पाऊस), द्वितीय - नानाभाऊ मोरे (एका उत्तराची कहाणी), प्रकाश योजना : प्रथम - विनेश लिमकर (एका उत्तराची कहाणी), द्वितीय - चेतन ढवळे (चाणक्य विष्णुगुप्त), नेपथ्य : प्रथम - विशाल शेळके (म्हातारा पाऊस), द्वितीय - अंजना मोरे (धन्वंतरी), रंगभूषा : प्रथम - चंद्रकांत सैंदाणे (चाणक्य विष्णुगुप्त), द्वितीय - प्रिया खताळ (पुरुषोत्तम).
उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक : प्रवीण कुलकर्णी (तू भ्रमत आहसि) व रेणूका सुर्यवंशी (एका उत्तराची कहाणी), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे : चैताली बर्डे (तो क्षण), प्रिया तेलतुंबडे (म्हातारा पाऊस), विद्या जोशी (सातेरं), भावना रणशूर (समांतर), अबोल जोशी (अनाथ), प्रा. रविंद्र काळे (चाणक्य विष्णुगुप्त), योगीराज मोटे (म्हातारा पाऊस), राहुल सुराणा (पुरुषोत्तम). गणेश लिमकर (धन्वंतरी), क्षितीज कंठाळे (तो क्षण).
दि. 15 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत माऊली सांस्कृतिक सभागृहात पार पडलेल्या स्पर्धेत 18 नाट्यप्रयोग सादर झाले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अविनाश कोल्हे, नरेंद्र आमले आणि विजय शिंगणे यांनी काम पाहिले. समन्वयक म्हणून सागर मेहेत्रे व सहसमन्वयक म्हणून जालिंदर यांनी जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडले. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.