1 जूनपासून बाजारपेठ सुरू करा ; अन्यथा आंदोलन

1 जूनपासून बाजारपेठ सुरू करा ; अन्यथा आंदोलन

अहमदनगर (प्रतिनिधी) - एप्रिल महिन्यापासून शहरात लॉकडाउन सुरु आहे. बाजारपेठा बंद असल्याने सर्व व्यापारी वर्ग अडचणीत सापडला आहे. आता करोना बाधितांची दैनदिन संख्या कमी होत आहे. त्यामुळे जिल्हा व मनपा प्रशासनाने शहरातील लॉकडाऊन 1 जूनपासून शिथिल करून काही तास व्यापारी वर्गास दुकाने उघडण्याची परवानगी देवून बाजारपेठ सुरु कराव्यात. अन्यथा भाजप व्यापारी आघाडीच्यावतीने शांत न बसता व्यापार्‍यांसमवेत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शहर भाजप व्यापारी आघाडीच्या शिष्ठमंडळाने उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना निवेदन देवून 1 जुनपासून दुकानांना वेळेची मर्यादा घालुन व नियमांचे बंधन घालुन दुकाने चालू करण्यास परवानगी देण्याची मागणी केली. यावेळी शहर व्यापारी आघाडीचे अध्यक्ष विलास गांधी, माजी सरचिटणीस अनिल गट्टानी, खजिनदार चेतन जग्गी, संतोष गांधी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी गांधी म्हणाले, व्यापारी वर्ग शासनाला सर्वात जास्त महसूल देत असतो. मात्र, लॉकडाऊनमुळे व्यापारी मोठ्या संकटात सापडला आहे. मागच्या वर्षीच्या लॉकडाऊननंतर सरकाने 1 जूनपासून बाजारपेठा सुरु केल्या होत्या. आता करोना बाधितांची संख्या कमी होत असल्याने मागच्या वर्षीप्रमाणे शासनाने व्यापारी वर्गास दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी. अन्यथा व्यापारी तीव्र आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी लक्ष्मीकांत हेडा, नितीन जोशी, विजय मुनोत, प्रसाद पटवा आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com