पाकिस्तानला कांदा व टोमॅटोची निर्यात त्वरित सुरू करा

स्वतंत्र भारत पार्टीची मागणी
पाकिस्तानला कांदा व टोमॅटोची निर्यात त्वरित सुरू करा

श्रीगोंदा | प्रतिनिधी

पाकिस्तानात कांद्याचे दर प्रचंड वाढले असून भारतातून कांदा व टमाट्याची आयात करण्याची मागणी होत आहे. भारताने तातडीने निर्यात सुरू करून भारतातील कांदा व टमाटे उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी पंतप्रधान व परराष्ट्र व्यवहार मंत्री यांना पत्र पाठवून केली आहे.

पाकिस्तानात अतिवृष्टी व महापुरांमुळे पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी पाकिस्तानात कांद्याचे दर ४०० रुपये प्रति किलो व टमट्याचे दर ५०० रुपये झाले आहेत व ७०० रुपया पर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तानातील व्यापारी वर्ग, भारतातून कांदा व टमाटे आयात करण्याची मागणी पाकिस्तान सरकारकडे करत आहेत.

भारतात मात्र कांद्याचे व टमट्याचे अद्याप ही उत्पादन खर्च पेक्षा कमी आहेत. कांदा चाळींमध्ये सडतो आहे व टमाटे रस्त्यावर फेकले जात आहेत. अशा परिस्थितीत भारताने पाकिस्तानला कांदा व टमाटे निर्यात करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी भारतातील शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे.

भारतात कांदा व साखरेचे दर नियंत्रित करण्यासाठी अनेक वेळा भारताने पाकिस्तानातून कांदा व साखरेची आयात केली आहे. सीमेवर कारगिलचे युद्ध सुरू असताना मोठ्या प्रमाणात साखरेची आयात करण्यात आली होती. भारताने पाकिस्तानला मदत करण्याचा हेतूने नव्हे तर भारतातील कांदा व टमाटे उत्पादक शेयकर्यांना मदत करण्यासाठी निर्यात सुरू करावी. अशी मागणी अनिल घनवट यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com