दिव्यांग शाळेतील कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू

दिव्यांग शाळेतील कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

राज्यातील दिव्यांग शाळेतील कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता याबाबत आ. डॉ.सुधीर तांबे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन मध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दोन महिन्यांमध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल असे आश्वासन दिले व काल त्याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला असून यामुळे दिव्यांग शाळेतील कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू होणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, इतर विभागातील शासकीय कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू झाला होता. मात्र विशेष व्यक्तींसाठी काम करणार्‍या दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग अद्याप लागू झालेला नव्हता यासाठी यासाठी आ. डॉ. सुधीर तांबे यांनी वारंवार पाठपुरावा केला. तसेच सहाव्या वेतन आयोगाच्या फरकासाठी देखील पाठपुरावा केला होता. तसेच दिव्यांग शाळांच्या कुठलाही प्रश्न असेल तो सोडविण्यासाठी आ. डॉ. सुधीर तांबे हे शासन दरबारी सातत्याने प्रयत्न करत असतात.

सातव्या वेतन आयोग लागू करण्यासाठी दिव्यांग शाळा कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्यासोबत पाठपुरावा केला.शासन या निर्णयामुळे हजारो कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार असून या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री विश्वजीत कदम तसेच विशेषतः नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ. डॉ. सुधीर तांबे या सर्वांचे राज्यातील दिव्यांग शाळा कर्मचारी संघटना व महासंघाने अभिनंदन केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com