एसटी कामगारांच्या भावनांशी खेळणारं महायुतीच सरकार बहिरं आणि आधळं - स्नेहलता कोल्हे.

एसटी कामगारांच्या भावनांशी खेळणारं महायुतीच सरकार बहिरं आणि आधळं - स्नेहलता कोल्हे.

कोपरगाव |प्रतिनिधी|Kopargav

महाराष्ट्र सरकार एसटी कामगारांच्या प्रश्नांची दखल घेत नाही. त्यांन साधी भेट सुध्दा परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली नाही. त्यांच्या मागण्या धुडकावून भावनांशी खेळणारं महायूतीचं सरकार म्हणजे बहिरं आणि आंधळं असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले.

भारतीय जनता पक्षाने राज्य एस टी कामगारांच्या आंदोलनाला पाठींबा दिला असून कोपरगांव आगारातील उपोषणकर्त्या चालक वाहकांची शुक्रवारी भेट घेवून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. एक आठवडयापासून एसटी कामगार संपावर आहे. महामंडळाचे शासन विलीनीकरण करा म्हणून आर्त हाक देत आहे. पण त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्याचे काम सुरू आहे. महिला वाहक राणी पारधी व अनिता वाघ यांनी तर थेट सौ. कोल्हे यांच्यासमोर हंबरडा फोडत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. एस टी कामगार हक्काचे मागणं मांडत आहे. तेव्हढच द्या असे सांगत राज्यातील एसटी कामगार आणि त्यांच्या कुटूंबियांचे काय दु: ख आहे याची जाणिव करून दिली.

38 एस टी कामगारांना यावेळी भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यांत येवुन राज्यभरातील एस टी कामगारांचे निलंबन सुरू असून त्याचा सौ. कोल्हे यांनी निषेध नोंदविला. प्रारंभी संजीव गाडे यांनी चालक वाहक कामगार संघटना विरहीत एकत्र येवुन हा लढा लढत आहेत असे सांगितले. देवदत्त आंदुरे यांनी प्रास्तविक करत एस टी कामगारांच्या मागण्यांचे निवेदनाबाबत माहिती दिली. आगारप्रमुख अभिजित चौधरी यांची भेट घेत सौ. कोल्हे यांनी एस टी कामगारांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे सांगितले.

याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, शहराध्यक्ष अविनाश पाठक, जिल्हा उपाध्यक्ष सिध्दार्थ साठे, विजय आढाव, बाळासाहेब नरोडे, महावीर दगडे, जयेश बडवे, रवि रोहमारे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, स्वप्नील निखाडे, विष्णुपंत गायवाकड, रिपाईचे जितेंद्र रणशुर, दिपक चौधरी, दिपक राउत, अशोक लकारे, गोपिनाथ गायकवाड, खालीकभाई कुरेशी, फकिरमहमंद पहिलवान, सत्येन मुंदडा, किरण सुपेकर, अल्ताफभाई कुरेशी, विनोद चोपडा, बाळासाहेब राउत, विजय चव्हाणके, निलेश बो-हाडे, सागर राउत, महेश गोसावी, स्वप्नील कडु, वैभव गिरमे, दिलीप शुक्ला, अनुराग येवले, दिनेश कांबळे, नरेंद्र डंबीर यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, संचालक, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, ग्रामिण भागाच्या दळणवळणाचा अविभाज्य भाग म्हणून महाराष्ट्र राज्य एस टी परिवहन महामंडळ काम करते. गेल्या दोन वर्षापासुन कोरोनाचे संकट आहे, आर्थीक घटी विस्कटलेली आहे.

एस टी चे चालक वाहक आपल्या कुटूंबाची पर्वा न करता सण-वार, यात्रा-जत्रा, शुभकार्ये, दुःखद घटना विसरून कामाला प्राधान्य देतात पण त्यांचे प्रश्न सोडवायला महायुती शासनाकडे वेळ नाही. फक्त मंत्री आणि त्यांचे आरोप प्रत्यारोप रूसवे फुगवे काढायला त्यांच्याकडे मुबलक वेळ आहे. हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे जनसामान्यांच्या सुख-दुःखाची काळजी करणारे नेतृत्व होते. सत्ता आणि खुर्च्या या जनसामान्यांच्या सेवेसाठी असुन त्या चाटायला नाहीत अशी त्यांची खंबीर भूमिका असायच. पण त्याला आता हरताळ फासला जात आहे. भावना शुन्य, जाड कातडयाचं हे सरकार असून एस टी कामगारांचे प्रश्न तातडीने सोडवा अन्यथा त्यांना रस्त्यावर येवुन संघर्ष करायची वेळ आली तर त्यांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे आहोत, हिंमत न हारता संघर्षाने न्याय मिळवू असे सौ. कोल्हे म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com