एसटी कर्मचार्‍यांचे ‘चलो मुंबई’

आता आझाद मैदानात आंदोलन
एसटी कर्मचार्‍यांचे ‘चलो मुंबई’

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एसटी कर्मचार्‍यांच्या (ST Workers) संपावर (Strike) अद्याप तोडगा एसटी (ST) निघाला नसल्याने संप (Strike) आता अजून चिघळण्याची चिन्हे आहेत. नगर जिल्ह्यासह (Ahmednagar District) राज्यभरातील संपकरी कर्मचार्‍यांनी मुंबईच्या (Mumbai) दिशेने कूच केली आहे. आझाद मैदानात (Azad Maidan) सुरू असलेल्या आंदोलनात (Movement) राज्यभरातील एसटी कर्मचार्‍यांनी एकत्रित येत आंदोलन करावे असे आवाहन माजी मंत्री सदाभाऊ खोत (Former Minister Sadabhau Khot) यांनी काल शुक्रवारी केले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातील काही एसटी कर्मचारी मुंबई कडे रवाना (ST Worker leaves for Mumbai) होत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातून (Ahmednagar District) पाथर्डी (Pathardi), शेवगाव (Shevgav), श्रीरामपूर (Shrirampur), कोपरगाव (Kopargav) या आगारातील काही एसटी कर्मचारी मुंबईकडे रवाना झाल्याचे समजते.

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी त्यास दुजोरा दिला आहे. तारकपूर आगारातून (Tarkpur Depo) काही कर्मचारी आपल्या बांधवांसाठी दिवाळी फराळ घेऊन मुंबई कडे रवाना झाले असून अजून काही कर्मचारी उद्या मुंबईला (Mumbai) जाणार आहेत.

पोलिसांनी घेतले ताब्यात

आज मनमाड येथून पंचवटी एक्सप्रेस ने मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या जवळपास 21 एसटी कर्मचार्‍यांना मनमाड रेल्वे स्थानकात अडवून ताब्यात घेण्यात आले आहे तर दुसरीकडे मुंबईच्या प्रवेशद्वारारावर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात असून संपकरी एसटी कर्मचार्‍यांना मुंबईत येण्यापासून रोखलं जात आहे. टोल नाक्यावर पोलिकांकडून गाड्यांची तपासणी करण्यात येत असून एसटी कर्मचार्‍यांना रोखून ताब्यात घेतलं जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com