एसटी बसमध्ये महिलेच्या पर्समधून चोरी करताना पाच महिलांना पकडले

एसटी बसमध्ये महिलेच्या पर्समधून चोरी करताना पाच महिलांना पकडले

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

लहान मुलाला चॉकलेट देत असल्याचे भासवून पाच महिलांनी पर्समध्ये हात घालून त्यातील रोख रक्कम व सोन्याचे दागीने असा 24 हजार रुपयांचा ऐवज जबरीने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी दुपारी नेवासा फाटा येथे घडली.

याबाबत सुरेखा गणेश घोडेचोर (वय 29) धंदा-खासगी नोकरी, रा. तेलकुडगाव ता. नेवासा यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, मी, माझे पती गणेश व मुलगा श्रेयस असे 17 फेब्रुवारी रोजी रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास एसटी महामंडळाचे बसने नेवासा फाटा येथून कुकाणा येथे जाण्यासाठी राजमुद्रा चौक येथे थांबलेलो असताना बस आल्याने आम्ही आमचेकडील पिशव्या घेऊन बसमध्ये बसत असताना माझे पती हे शेजारील दुकानात पाण्याची बॉटल घेण्यास गेले असता पाच महिला माझे शेजारी आल्या व त्यातील एका महिलेने माझा मुलगा श्रेयस यास पकडून त्यास चॉकलेट देत असल्याचे भासवून इतर महिला यांनी माझेकडील पर्समध्ये हात घालून त्यातील रोख रक्कम व सोन्याचे दागीने जबरीने चोरून नेले.

मी आरडाओरडा केल्याने माझे पती गणेश व चौकातील काही लोक व पोलीस तेथे आले असता सदर महिला यांना सर्वांनी जागीच पकडून त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याची नावे संतोषी रामू पाताडी, पेटमा पेटयाँ कारपूर, लक्ष्मी बालाजी कारपूर, अंकटमा अकटयाँ कारपू, नेत्रा रवी म्हसणजोगी (सर्व रा. पाथर्डी जि. अ.नगर) असे असल्याचे सांगितले. या फिर्यादीवरुन पाचही महिलांवर लूट केल्याचा कलम 395 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com