चालू बसच्या चाकाचे नट बोल्ट निखळले

अन् असे वाचले प्रवाशांचे प्राण || वाचा पुढे काय झाले
चालू बसच्या चाकाचे नट बोल्ट निखळले

करंजी |प्रतिनिधी| Karanji

अहमदनगरकडून शेवगावकडे निघालेल्या शेवगाव डेपोच्या एसटी बसच्या चाकाचे नट बोल्ट निखळल्याचा प्रकारचा प्रकार लक्षात येताच जागृक नागरीकाने एसटीचा एक किलोमीटर पाठलाग करून चालकाच्या ही बाब लक्षात आणुन दिली यामुळे प्रवाशांचे प्राण वाचल्याचा प्रकार गुरुवारी (दि.8) सकाळी घडला.

शेवगाव डेपोची अमदनगरहुन शेवगावकडे सकाळी निघालेली एसटी बस साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मेहेकरी फाटा येथे प्रवाशांसाठी थांबली. या एसटी बसच्या चालकाच्या बाजुच्या पाठीमागील चाकाचे नटबोल्ट निघाले असल्याचे येथील हॉटेल व्यवसायिक व सामाजिक कार्यकर्ते सुधीर वायकर यांच्या लक्षात आले. त्यांनी आवाज देईपयर्र्ंत एसटी पुढे निघुन गेली. यामुळे वायकर यांनी मोटारसायकलवरून या एसटी बसचा एक किलोमीटरपर्यंत पाठलाग करून बस थांबवली.

व नट बोल्ट निघाल्याचे चालकाच्या निदर्शनास आणून दिले. चालकाने तात्काळ काही नागरीकांची मदत घेत नट बोल्ट पुर्ववत घट्ट बसवले. व बस मार्गस्थ झाली. वायकर यांच्यामुळे एसटीचा मोठा अपघात होण्याचे टळले असून एसटी बसमधील सुमारे 50 प्रवाशांचे प्राण देखील वाचले. बसमधील प्रवाशांनी बसच्या खाली उतरून सुधीर वायकर यांना धन्यवाद दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com