बसमधील प्रवासी महिलेचे अडीच तोळ्याचे दागिने लंपास

बसमधील प्रवासी महिलेचे अडीच तोळ्याचे दागिने लंपास

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

एसटी बसमध्ये प्रवास करीत असताना उमा शिंदे या महिलेच्या पर्समधील सुमारे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात भामट्याने चोरून नेल्याची घटना दि. 14 ऑगस्ट रोजी घडली आहे.

उमा सविनय शिंदे, रा. शाहूनगर, राहुरी, हल्ली रा. ज्ञानेश्वर कॉलनी, कृषी विद्यापीठ, राहुरी या दि. 14 ऑगस्ट रोजी दुपारी सव्वादोन वाजे दरम्यान राहाता तालुक्यातील कोल्हार ते राहुरी कृषी विद्यापीठ या दरम्यान एसटी बसमधून प्रवास करीत होत्या. या प्रवासा दरम्यान कोणीतरी अज्ञात भामट्याने त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले 25 हजार रुपये किंमतीचे सुमारे अडीच तोळे वजनाचे गंठण व ठूशी हे सोन्याचे दागिने चोरून नेले.

प्रवासा दरम्यान आपल्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरी गेल्याचे लक्षात येताच उमा शिंदे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेली घटना पोलिसांना सांगितली. उमा सविनय शिंदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात भामट्या विरोधात गुन्हा रजि. नं. 764/2022 भादंवि. कलम 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक गणेश सानप हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com