एसटी बस-पिकअपचा अपघात

आठ प्रवाशी जखमी
एसटी बस-पिकअपचा अपघात

घारगाव |वार्ताहर| Ghargav

पुणे-नाशिक महामार्गावर (Pune-Nashik Highway) आळेफाट्यानजीक (Alephata) (जुन्नर) एसटी बस आणि मालवाहतूक पीकअपला झालेल्या अपघातात आठ जण जखमी झाले. हि घटना गुरुवारी (24 मार्च) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.

याबाबत सामजलेली अधिकची माहिती अशी की, नाशिकहून पुण्याकडे (Nashik Pune) जाणारी एस टी बस (ST Bus) (क्रमांक एम.एच 14 बी टी 4079) व आळेफाटा बाजूने संगमनेरकडे जाणारी मालवाहू पिकअप (क्रमांक एम एच 48 बी. एम. 6014) यांचेत आळेफाट्याजवळील शुभम तारांगण सोसायटी समोर विचित्र अपघात (Accident) झाला. या अपघातात पिकअप टेम्पो चालक सुरज सरदार (वय 25 रा. डहाणू) याचेसह एस टी बसमधील प्रवाशी सिमा नरेश भूसे ( वय 50, रा. नाशिक), बाळासाहेब दिगंबर घोडेकर (वय 67, रा. समशेरपूर ता. अकोले), बबन कुमार पटेल (वय 33, पुणे मुळ रा. बिहार), तुकाराम भागुजी डोंगरे (वय 72, रा. अकलापूर, ता. संगमनेर), दत्तात्रय बाबुराव गिते (वय 35, रा. सिन्नर नाशिक), अवि मुल्लाह (वय 26) व तकदीर मुल्लाह (वय 70 दोघेही रा. नाशिक) यांचेसह वाहक हे जखमी झाले. तर पिकअप चालक सुरज हे या अपघातात गंभीर जखमी झाले.

दरम्यान अपघात (Accident) घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी सर्व जखमींना तातडीने आळेफाटा (Alephata_ येथील खाजगी रूग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले असून पुढील तपास आळेफाटा पोलिस (Alephata Police) करत आहेत. अपघातानंतर महामार्गावर दुतर्फा वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com