एसटी व दुचाकीचा अपघात, एक जखमी

एसटी व दुचाकीचा अपघात, एक जखमी

वडाळा महादेव |वार्ताहर| Vadala Mahadev

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील वडाळा महादेव (Vadala Mahadev) येथे एसटी व दुचाकीचा अपघात (ST Bus And Bike Accident) झाला. अपघातात तालुक्यातील मुठेवाडगाव येथील शिक्षक महेश शिवाजी शिंदे (वय 28) यांच्या डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी (Injured) झाले. अपघातात त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले.नेवासा रोडवरील कॉलेज परिसरामध्ये सकाळी 8.45 च्या दरम्यान हा अपघात झाला.

एसटी व दुचाकीचा अपघात, एक जखमी
पोलीस भरती लेखी परीक्षेला 825 उमेदवारांची दांडी!

नेवासा (Newasa) डेपो येथील चालक ज्ञानेश्वर नाथा भालेकर (मु. पा. पिंपळवाडी, ता. पाटोदा, जि. बिड) हे छत्रपती संभाजीनगर ते शिर्डी नेवासामार्गे बस (एमएच 07 सी 9257) घेऊन जात असताना वडाळा महादेव येथी एसटीच्या पाठीमागील भागात अपघात (Accident) झाला. यामध्ये होन्डा शाईन कंपनीच्या दुचाकी (क्र. एमएच 17 सीएफ 6243) वरील शिंदे जखमी (Injured) झाले.

एसटी व दुचाकीचा अपघात, एक जखमी
मनपाकडून यंदा सर्वोच्च 70 कोटींची वसुली

यावेळी ग्रामस्थांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन (Shrirampur Police Station) येथे अपघाताची माहिती दिली. पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल तुषार गायकवाड, प्रवीण कांबळे यांनी घटनास्थळी भेट देत वाहतूक सुरळीत करून अपघातग्रस्त श्री. शिंदे यांना वैद्यकीय उपचारासाठी साखर कामगार रुग्णालयात हलविले.

एसटी व दुचाकीचा अपघात, एक जखमी
बागेश्वर बाबाचे साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, शिर्डीकर संतप्त

यावेळी श्रीरामपूर एसटी विभागातील अधिकारी श्री. कासार व श्री. संसारे यांनी भेट देऊन अपघातग्रस्त एसटी श्रीरामपूर शहर पोलीस यांच्याकडून ताब्यात घेतली. या परिसरात वारंवार अपघात होत असून अनेकांना दुखापत तसेच अपघातात जीव गमवावा लागला आहे. प्रशासनाने या परीसरात गतिरोधक बसवावेत, अशी मागणी येथील नागरीकांनी केली आहे.

एसटी व दुचाकीचा अपघात, एक जखमी
32 गावांतील पाणी नमुने दूषित

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल (Filed a Case) केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांचे मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलिस करीत आहेत.

एसटी व दुचाकीचा अपघात, एक जखमी
ड्युटीवर निघालेल्या नर्ससोबत रस्त्यात गैरवर्तन
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com