
कर्जत |प्रतिनिधी| Karjat
जामखेड तालुक्यातील (Jamkhed Taluka) देवदैठण (Devdaithan) येथील मयुर (अर्थव) महादेव हजारे या विद्यार्थ्यांने दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने कर्जत (Karjat) येथे शिकत आसलेल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Student Suicide) केली आहे. यामुळे कर्जत (Karjat) व जामखेड (Jamkhed) परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
महादेव हजारे हे तालुक्यातील देवदैठण (Devdaithan) येथील रहिवासी असून ते कर्जत (Karjat) तालुक्यात शिक्षक म्हणून नोकरीला आहेत. त्यांचा मुलगा मयुर (अर्थव) हजारे हा कर्जत येथील महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत होता शुक्रवारी दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. यात मयुर यास 60 टक्केच गुण मिळाले.
यामुळे त्यास नैराश्य आले व घरात कोणी नसतांना राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. यामुळे परिसरातील एकच खळबळ उडाली आहे. त्याच्यावर देवदैठण (Devdaithan) येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.