परीक्षा केंद्रांना पोलीस बंदोबस्त मिळेना

जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाची तक्रार
परीक्षा केंद्रांना पोलीस बंदोबस्त मिळेना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील 950 केंद्रावर 70 हजार 950 विद्यार्थ्यांची मंगळवारपासून दहावी बोर्डाची (एसएससी) परीक्षा (SSC Exam) होत आहे. परीक्षेत गैरप्रकार (Exam malpractice) टाळण्यासाठी व शिक्षकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणाने प्रत्येक परीक्षा केंद्रास पोलीस बंदोबस्त (Police security at the examination center) देण्याची मागणी जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने करण्यात आली आहे.

संघटनेच्या शिष्टमंडळाने काल संध्याकाळी माध्यमिक शिक्षण विभागासमोर (Department of Secondary Education) हा गंभीर प्रश्न उपस्थित करुन माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक सुभाष कराळे (Superintendent of Education Subhash Karale) यांना निवेदन दिले. यावेळी संघटनेचे सरचिटणीस आप्पासाहेब शिंदे, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे, बद्रीनाथ शिंदे, रमाकांत दरेकर, विठ्ठल काळे, देवीदास पालवे, सतीश सातपुते, महेश शेळके, चंद्रकांत बर्डे, बाळासाहेब निवडुंगे, राहुल झावरे, महेश दरेकर, रविंद्र गावडे, प्रशांत सोनवणे आदी उपस्थित होते.

करोना परिस्थितीमुळे सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांची शाळा हीच त्यांचे परीक्षा केंद्र आहे. यामुळे सर्व विद्यार्थ्यांची आपल्या शाळेतच परीक्षा होणार आहे. मागील काही वर्षापासून बोर्डाच्या परीक्षांमध्ये कॉपीचे व इतर गैरप्रकाराला शिक्षकांनी विरोध केल्यास त्यांच्यावर हल्ले होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. अनेक तालुक्यात केंद्रप्रमुखांना परीक्षा काळात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बोर्डाच्या परीक्षेत होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी व शिक्षकांना संरक्षण देण्याची पोलीस बंदोबस्ताची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शिक्षकांनी करोना काळात पोलीसांच्या खांद्याला खांदा लाऊन योगदान दिले. परीक्षेच्या काळात शिक्षकांना सहकार्य करण्याची अपेक्षा असून, इयत्ता दहावी बोर्डाच्या सर्व परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com