श्रीक्षेत्र देवगड, शनीशिंगणापूर येथे मास्कसक्ती

देवगड
देवगड

देवगड फाटा |वार्ताहर| Devgad Phata

करोनाच्या नवीन व्हेरिएन्टच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सतर्कता बाळगण्यासाठी श्रीक्षेत्र देवगड दत्त मंदिर देवस्थानच्या वतीने हालचाली सुरू झाल्या असून अन्य देवस्थानांप्रमाणे कर्मचार्‍यांसह भाविकांना देखील आता मास्क व सामाजिक अंतराचे पालन करण्याची सक्ती करण्यात आली आहे.

भाविकांनी दत्त मंदिर देवस्थानने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे व मास्क परिधान करून सामाजिक अंतराचे पालन करूनच दर्शन घ्यावे, असे आवाहन श्री दत्त मंदिर संस्थानच्यावतीने करण्यात आले आहे. भाविकांसाठी अद्यापही कुठलेही करोना नियम शासनाकडून सक्तीचे करण्यात आले नसले तरी आता इतर देशांत करोनाच्या नव्या व्हेरिएन्टने डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डीसह अन्य देवस्थानने मास्क सक्ती केलेली असल्याने भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने देवगड येथील श्री दत्त मंदिर संस्थानचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली देवगडच्या कार्यकारी मंडळ व संस्थान प्रशासनाने मास्क सक्ती केली असल्याचे संस्थानच्या वतीने सांगण्यात आले.

दररोज हजारो भाविक श्रीक्षेत्र देवगड येथे दर्शनासाठी येत असतात. नाताळची सुट्टी व नवीन वर्षाच्या निमित्ताने दर्शनासाठी दररोज येथे गर्दी होत असल्याने वाढती गर्दी लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून देवदर्शनासाठी येणार्‍या भाविकांनी मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर ठेवून दर्शन घ्यावे व संस्थान केलेल्या नियम व सूचनांचे पालन करावे असे आवाहन श्रीक्षेत्र देवगड दत्त मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

शनीशिंगणापूर |वार्ताहर|Shanishingnapur

करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शनीशिंगणापूर देवस्थानने कर्मचारी, भाविक यांना मास्क, सॅनिटायझर वापरण्याची सक्ती करण्याचा निर्णय देवस्थानच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सलग सुट्ट्यांमुळे शनिदर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. दोन वर्षांपूर्वी नागरिकांनी तो काळ बराच काही शिकवून गेला आहे.

राज्यातून परराज्यातील भाविक सुट्ट्याच्या काळात लाखो भाविक येत असतात याचे गांभीर्य घेऊन देवस्थान प्रशासनाने निर्णय घेतला आहे. आता येणार्‍या संकटास तोंड देण्यासाठी व आरोग्यासाठी शनिशिंगणापूर देवस्थान सतर्क झाले आहे. तातडीने काटेकोरपणे नियमांचे पालन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करण्याचे आवाहन अध्यक्ष भागवत बानकर व विश्वस्तांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com