श्रीक्षेत्र देवगड दत्तजयंती सोहळ्याकरिता 56 होमगार्ड बंदोबस्तासाठी सज्ज

देवगड
देवगड

नेवासाफाटा |प्रतिनिधी| Newasa Phata

नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे होत असलेल्या श्री दत्त जयंती सोहळ्यासाठी बंदोबस्ताकरिता नेवासा होमगार्डचे 50 होमगार्ड व 6 महिला सज्ज झाल्या आहेत. नेवासा होमगार्ड ची स्थापना 1952 साली झाली तर श्रीक्षेत्र देवगडचे मंदिर बांधकाम 1957 साली सुरू होते. मंदिर बांधून पूर्ण झाल्यानंतर दत्तजयंती उत्सवाला किसनगिरी बाबांनी सुरुवात केली त्यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्व.गोपाळराव थावरे हे होमगार्ड समादेशक म्हणून काम पहात होते.

तेव्हापासून दत्तजयंती उत्सवात नि:शुल्क भक्तांसाठी बंदोबस्त देऊन सेवा देण्यासाठी नेवासा होमगार्डने संकल्प केला होता. त्यानंतर स्व. विठ्ठलराव जंगले पाटील हे समादेशक झाले. त्यांनी देखील त्यावेळी पंधरा ते वीस होमगार्डला बरोबर दत्तजयंती उत्सवासाठी बंदोबस्त दिला. त्यानंतर ही परंपरा सुरूच झाली देवगड दत्तजयंती सोहळ्यात पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त देण्यासाठी होमगार्ड समादेशक पत्रकार बाळासाहेब देवखिळे व जनसंपर्क अधिकारी सुधीर चव्हाण, पलटणनायक अशोक टेमकर, पलटणनायक व पोलीस पाटील दिलीप गायकवाड, पलटणनायक श्रीकांत ससे, दादासाहेब कणगरे, अल्ताफ शेख, राजेंद्र बोरुडे, अरुण देवढे, गफार शेख, उमेश इंगळे, होमगार्ड विकास बोर्डे, अशोक चव्हाण, मोहन गायकवाड, शकील शेख यांच्यासह 50 होमगार्ड व सहा महिला होमगार्ड सज्ज झाले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com