सोनई परिसरात हनुमान जयंती सोहळा उत्साहात

सोनई परिसरात हनुमान जयंती सोहळा उत्साहात

सोनई |वार्ताहर| Sonai

सोनई येथील नदीपात्रातील व परिसरातील हनुमान मंदिरात शनिवारी हनुमान जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसभर मंदिरांच्याबाहेर दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

हनुमान जयंतीनिमित्त नदीपात्रातील हनुमान मंदिरात फुलांची सजावट व रोषणाईने मंदिर सजविण्यात आले होते. मारुती मित्र मंडळ व भाविकांनी या उत्सवाचे आयोजन केले होते. हनुमान चालीसा पठण व पुजापाठ यावेळी करण्यात आले. सकाळी अभिषेक, जन्मोत्सव व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी बाफना यांच्यावतीने भाविकांना सरबत व शनैश्वर तरुण मंडळाच्यावतीने प्रसाद वाटप करण्यात आला. महेश चौकातील हनुमान मंदिरात संध्याकाळी सामूहिक हनुमान चालीसाचे पठण होऊन अन्नदान करण्यात आले.

सोनई परिसरातील महावीर पेठ, गडाख गल्ली व महेश चौकातील हनुमान मंदिर तसेच हनुमानवाडी, श्रीरामवाडी, गणेशवाडी, कन्हेरवस्ती, बेल्हेकरवाडी, लांडेवाडी, पानसवाडी येथेही हनुमान मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com