कोविड बैठकीत विखेंचा अध्यात्मिक मंत्र, अधिकार्‍यांना म्हणाले...

कोविड बैठकीत विखेंचा अध्यात्मिक मंत्र, अधिकार्‍यांना म्हणाले...

शिर्डी ( प्रतिनिधी ) shirdi - करोनाने पाय पसरल्यानंतर जिल्ह्यातील नेते स्थिती हाताळण्यासाठी सक्रीय झाल्याचे चित्र काही दिवसांपासून दिसत आहे. आरोग्य उपाययोजनांसोबत यंत्रणेचे मनोधैर्य वाढविण्यासाठीही नेते सरसावल्याचे चित्र आहे.

माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी येथील बैठकीत अधिकार्‍यांना जबाबदारीची जाणीव करून देतानाचा मानसिक धैर्य देण्याचा प्रयत्न केला. ‘रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून सर्वानाच या संकटाचा सामना धैर्याने करावा लागेल, यासाठी सर्वजण तुमच्या समवेत असल्याचा दिलासा त्यांनी अधिकार्‍यांना दिला.

कोव्हीड रूग्णालयात बेडची संख्या वाढवितानाच सर्व सुविधांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व निर्णय विनाविलंब घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

पालकमंत्र्यांच्या दौर्‍यानंतर आ.विखे पाटील यांनी शिर्डी येथे अधिकार्‍यांसमवेत बैठक घेवून कोव्हीड परिस्थितीचा आढावा घेतला. वाढत चाललेली रूग्ण संख्या, कराव्या लागणार्‍या उपाय योजना, आरोग्य सुविधांवर असलेला ताण विचारात घेवून करावे लागणारे नियोजन यासंदर्भात त्यांनी महसूल व वैद्यकीय विभागाचे अधिकारी, शिर्डी संस्थानचे प्रतिनिधी यांच्याशी विचार विनीमय करून तातडीने अंमलबजावणी करण्याचे सूचित केले.

यापूर्वी अधिकारी, कर्मचारी यांनी मागील वर्षभरात एकत्रितपणे केलेल्या उपाय योजनांमुळे हे संकट रोखण्यात यश आले. परंतू या संकटाचे दुसरे संक्रमण सुरू झाल्यानंतर रुग्णांची वाढलेली संख्या ही सर्वाच्याच दृष्टीने चिंतेची असली तरी रुग्णांना मदतीसाठी तत्पर राहावे लागेल असे स्पष्ट करून आ.विखे पाटील म्हणाले की, संस्थानच्या रूग्णालयात अधिकच्या बेडची उपलब्धता करताना ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटरची संख्या वाढविण्यासाठी यापूर्वी झालेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याबाबत त्यांनी अधिकार्‍यांना सूचना केल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com